Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
पत्रकार

“रिसोड तालुक्यातील पी. एम. किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ कधी मिळणार?”

Admin • 13 Aug 2024, 05:34 PM

“जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या आदेशाला कृषी सहाय्यकाने नकार !”
“महसुली कामे महसुली विभागाने पुर्ण करावी”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – मोठ्या थाटामाटात चाललेल्या पी.एम.किसान योजनेअंतर्गत अगोदर लाभ मिळत असलेल्या व अचानकपणे लाभ मिळत बंद झालेल्या शेतकऱ्यांची जवळपास एक वर्षापासून होत असलेली हेळसांड, त्यामध्ये असलेल्या त्रुटी, ह्या पूर्ण करुन सुद्धा शेतकऱ्यांच्या तहसील व कृषी कार्यालयात फेऱ्या मारून कंटाळलेला शेतकरी व त्यातच शासनाने एक-ना अनेक त्रृट्या काढत शेतकऱ्यांना मानसिक त्रास देण्याचे ठरवले काय ? असा प्रश्न शेतकरी बोलतांना व फेऱ्या मारतांना त्रस्त होऊन मनाशीच बोलत असतो. त्यातच रिसोड महसूल विभागाने कृषी विभागाकडे दिलेल्या पी.एम.किसान योजनेच्या अंतर्गत त्रुट्या म्हणजेच सात बारा,आठ अ, फेरफार जमा करून पूर्ण करण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांला दिलेले आदेश कित्येक दिवस झाले, पूर्ण होतांना दिसत नाहीत व ते पूर्ण होऊ नयेत असे शासनाला वाटते का? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडत चाललेला यक्ष प्रश्न आहे. आता सध्या स्थितीत पी.एम.किसान योजनेअंतर्गत जे शेतकरी त्रुटी मध्ये दाखवले आहेत त्या शेतकऱ्यांना सातबारा, आठ अ , फेरफार इत्यादी कागदपत्रे संबंधित कृषी सहायक यांनी जमा करावे असे जिल्हा कृषी अधिक्षक यांनी ३०/७/२०२३ ला दिलेल्या पत्रात आदेशीत केले होते,असे समजते,परंतु दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी तालुका कृषी सहायक संघटनेने तालुका कृषी अधिकारी रिसोड यांना निवेदन दिले की महसुली कामे तलाठी यांनीच करावे हे महसुली काम कृषी विभागाकडून करण्यात येऊ नये यासाठी तालुका कृषी सहायकांनी ही कामे करण्यास नकार दिल्याने त्यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत सद्यस्थितीत लाभ मिळत नसलेल्या शेतकऱ्यांची कामे होतांना दिसत नाहीत, कामास खिळ बसली आहे.यामध्ये शेतकरी भरडला जातोय याबाबत काय तो निर्णय जिल्हाधिकारी(महसुल) व जिल्हा कृषी अधीक्षक वाशिम यांनी एकत्र बसून निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही,व या कामास वेळही जाणार नाही. याबाबत काळजी घेतली तर शेतकऱ्यांना आनंदच होईल.व पी.एम.किसान योजनेचे पात्र लाभार्थीना लाभ मिळेल. सातबारा आठ अ फेरफार ही महसुली कागदपत्रे ऑनलाईन आहेत तर परत मागायची काय जरुरत असा सामान्य शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.