Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
खानदेश

महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!

Administrator • 26 Nov 2026, 01:52 PM

गेल्या ८ ते १० दिवसांपासून सर्व्हरचा खोळंबा; शासकीय दाखले, प्रमाणपत्रे आणि ऑनलाइन अर्जांची कामे रखडली, प्रशासनाने तातडीने तांत्रिक अडचण दूर करण्याची मागणी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस | जळगाव जिल्हा प्रतिनिधी : विनोद तायडे

राज्यातील नागरिकांना विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे आणि ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देणारे महा-ऑनलाइन (Maha-Online) संकेतस्थळ गेल्या ८ ते १० दिवसांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी तसेच ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे आणि विविध शासकीय योजनांचे अर्ज भरण्यासाठी या पोर्टलचा वापर केला जातो. मात्र, सध्या संकेतस्थळ उघडण्यास बराच वेळ लागत असून, अर्ज सबमिट करताना साइट हँग होणे, एरर येणे आणि सेशन एक्सपायर होणे अशा समस्या वारंवार उद्भवत आहेत.

एका अर्जासाठी तासन्तास प्रतीक्षा!

पूर्वी काही मिनिटांत पूर्ण होणाऱ्या ऑनलाइन कामांसाठी आता तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. सेवा केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढत असून, कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने केंद्रचालकांनाही नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे.

विशेषतः शैक्षणिक प्रवेश, नोकरीसाठी आवश्यक प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांच्या अर्जांची मुदत जवळ आलेली असताना या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. वेळेत अर्ज सादर न झाल्यास त्याचा फटका पात्र लाभार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.

तांत्रिक विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज!

महा-ऑनलाइन संकेतस्थळाच्या संथगतीमुळे शासकीय ऑनलाइन सेवांचा उद्देशच बाधित होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासन आणि महा-ऑनलाइनच्या तांत्रिक विभागाने सर्व्हरची क्षमता वाढवून निर्माण झालेली समस्या तातडीने दूर करावी. तसेच तांत्रिक अडचणींमुळे अर्ज सादर करू न शकलेल्या नागरिकांना आवश्यकतेनुसार मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नागरिक व आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून होत आहे.

डिजिटल सेवा देण्याचा दावा असताना नागरिकांना एका ऑनलाइन अर्जासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असेल, तर या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार? याकडे आता संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

आपल्या भागातील ठळक घडामोडी, नागरिकांच्या समस्या आणि जनहिताच्या बातम्यांसाठी पाहत राहा — स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस न्यूज नेटवर्क!

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.