Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
अहमदनगर

राहुरी शहर जनरल व्यापारी असोसिएशन राहुरीच्या अध्यक्षपदी मा.श्री. स्वप्निलशेठ कासार यांची बिनविरोध निवड

Admin • 26 Aug 2025, 08:17 AM

राहुरी शहर जनरल व्यापारी असोसिएशन राहुरीच्या अध्यक्षपदी मा.श्री. स्वप्निलशेठ कासार यांची बिनविरोध निवड

दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी राहुरी शहर स्टेशनरी ,जनरल, कॉस्टेमिक व झेरॉक्स असोसिएशनची सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.नुकतेच नेवासा येथे एका दुकानाला लागलेल्या आहेत मृत्युमुखी पडलेल्या कासार कुटुंबातील ५ व्यापारी बांधवांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

संस्थेचे मावळते अध्यक्ष श्री अनिल भट्टड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये सचिव श्री.आप्पासाहेब सरोदे यांनी गेल्या ५ वर्षातील विविध उपक्रमांची माहिती दिली व कोषाध्यक्ष श्री.युवराज चव्हाण यांनी आर्थिक ताळेबंदाचा हिशोब मांडला.
यावेळी जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाल संपुष्टात आल्याने नव्या कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. असोसिएशनच्या अध्यक्षपदी मा.श्री. स्वप्निलशेठ कासार यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सिद्धार्थ रासने,सचिवपदी श्री.अप्पासाहेब सरोदे,खजिनदारपदी श्री.युवराज चव्हाण
संपर्कप्रमुख श्री.मधुकरभाऊ घाडगे यांची निवड करण्यात आली.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.स्वप्निल कासार म्हणाले की सर्वांनी एकमताने माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. यापुढील काळात असोसिएशनच्या सर्व सभासदांचे हित लक्षात घेऊन सर्वांना सोबत घेऊन अनेक विधेयक कामे आपण करणार आहोत.असोसिएशनच्या माध्यमातून व्यापारी बांधवांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचा संकल्प आम्ही केला आहे”.

या बैठकीत नवनिर्वाचित कार्यकारणीचे सर्व व्यापारी बांधवांकडून अभिनंदन करण्यात आले तर आभार संपर्कप्रमुख श्री.मधुकर घाडगे यांनी केले.

या बैठकीसाठी श्री.अनिलशेठ भट्टड,श्री.सिद्धार्थ रासने, श्री.मधुकरभाऊ घाडगे,श्री.युवराज चव्हाण,श्री.आप्पासाहेब सरोदे,श्री.किरण पवार,श्री.जैन सर,श्री.राजेश उपाध्याय,श्री.जैन सर,श्री.रविभाऊ जाधव,श्री.अमर कुंभकर्ण,श्री.मुकुंद कोळपकर,श्री.प्रकाश इंगळे,श्री.नवनाथ पवार,श्री.महेश राका,श्री.किशोर निंगुणकर सर, रेहान शेख यांच्या सह व्यापारी बांधव उपस्थित होते

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.