Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
आंतरराष्ट्रीय

आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओ चेक पोस्ट बंद करण्याच्या कार्यवाहीला वेग

Admin • 08 Jan 2026, 02:02 PM

राज्यातील आरटीओ सीमा तपासणी नाक्यांवर होणारी वाहनधारकांची लूट आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पत्रव्यवहाराची आणि विधिमंडळात मांडलेल्या औचित्याच्या मुद्द्याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात या नाक्यांवरील कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे.
आमदार खडसे यांनी आपल्या पत्राद्वारे या नाक्यांवरील ‘कार्ड सिस्टीम’ आणि कंत्राटदाराकडून होणारी अवैध वसुली पुराव्यासह शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार, शासनाने संबंधित सेवापुरवठादार कंपनीला २७ जून २०२५ रोजी कंत्राट रद्द करण्याची (Termination Notice) नोटीस बजावली आहे. या निर्णयामुळे कंत्राटदाराला द्यावी लागणारी भरपाई आणि कायदेशीर बाबींचा रोडमॅप तयार असून, मंत्रिमंडळाच्या अंतिम मान्यतेनंतर हे नाके कायमचे बंद होतील.
तसेच, नाके बंद करण्याच्या प्रक्रियेत खोडा घालणारे निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या विरोधातही खडसे यांनी पत्राद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार खरमाटे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) चौकशी करण्याची नस्ती १२ ऑगस्ट २०२५ रोजी गृह विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. आमदार एकनाथराव खडसे यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे राज्यातील लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.