बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ : सायकलिंगच्या माध्यमातून भारताची जागतिक क्रीडा ओळख

माध्यमातून भारताची जागतिक क्रीडा ओळखबालेवाडी (पुणे) येथे सुरू असलेली ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ ही केवळ एक सायकल स्पर्धा नसून, भारताच्या क्रीडा क्षेत्रातील जागतिक महत्त्वाकांक्षेचे प्रतिक ठरत आहे. बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ : सायकलिंगच्या
भारतात प्रथमच UCI मान्यताप्राप्त (2.2 श्रेणीतील) आंतरराष्ट्रीय बहु-टप्पा सायकल स्पर्धेचे यशस्वी आयोजन होणे, ही क्रीडा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय विश्वासार्हतेची मोठी पावती मानली जात आहे.या स्पर्धेच्या पुणे–हवेली–पिंपरी चिंचवड या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार व केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते होणे, यामुळे शासनाच्या क्रीडा प्रोत्साहन धोरणाला बळ मिळाल्याचे स्पष्ट होते. केंद्र व राज्य शासन यांच्यातील समन्वयातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा भारतात यशस्वीपणे आयोजित होऊ शकतात, याचे हे ठोस उदाहरण आहे.३५ हून अधिक देशांतील २९ आंतरराष्ट्रीय संघांचे १७० पेक्षा जास्त व्यावसायिक सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले असून, यामुळे पुणे जिल्हा थेट जागतिक क्रीडा नकाशावर अधोरेखित झाला आहे. पुणे, मुळशी, मावळ, पुरंदर, बारामतीसारख्या भौगोलिकदृष्ट्या विविध भागांतून जाणारी ही स्पर्धा, महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्यासह सांस्कृतिक समृद्धीचेही जागतिक दर्शन घडवत आहे.बजाज ऑटोसारख्या देशांतर्गत औद्योगिक समूहाने टायटल स्पॉन्सरशिप स्वीकारणे, ही क्रीडा व उद्योग क्षेत्रातील सकारात्मक भागीदारी दर्शवते. अशा भागीदारीमुळे देशातील सायकलिंग क्रीडेला नवी दिशा मिळण्यासोबतच, तरुणांमध्ये आरोग्य, शिस्त आणि स्पर्धात्मकतेची भावना रुजवली जात आहे.विशेष म्हणजे, या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा पर्यटन या संकल्पनेला चालना मिळत आहे. जागतिक खेळाडू, संघ, प्रशिक्षक व क्रीडा रसिक भारतात येत असल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत असून, भारत एक संभाव्य आंतरराष्ट्रीय क्रीडा केंद्र म्हणून पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.एकूणच, ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ ही स्पर्धा केवळ सायकलिंगपुरती मर्यादित न राहता, भारताच्या क्रीडा धोरणाची, युवकशक्तीची आणि जागतिक स्तरावरची विश्वासार्हतेची ओळख बनत आहे. भविष्यात अशा अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतात होणे, ही काळाची गरज असून, त्यासाठी ही स्पर्धा एक मजबूत पाया घालून गेली आहे.






