Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
क्राईम

बाप लेकाच्या नात्याला काळिमा; पैशांची मागणी….वडिलांचा पैसे देण्यास नकार अन् मुलाने बेल्ट व काठीने वडिलांचा घेतला जीव….!

Admin • 16 Feb 2026, 06:32 PM

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात बाप लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैशांच्या वादातून एका तरुणाने आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील एम.जी. नगर परिसरात वास्तव्यास असलेले ६८ वर्षीय भिकन राणा मोरे यांचा त्यांचा मुलगा कल्पेश मोरे याने बेदम मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे. कल्पेश हा गेल्या काही दिवसांपासून नवीन रिक्षा खरेदीसाठी वडिलांकडे पैशांची मागणी करत होता. मात्र घरची परिस्थिती लक्षात घेता वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने पिता-पुत्रामध्ये वारंवार वाद होत होते.

घटनेच्या दिवशी पुन्हा एकदा रिक्षासाठी पैशांवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात कल्पेशने घरातील लाकडी काठी आणि कमरेचा पट्टा (बेल्ट) घेऊन वडिलांवर हल्ला केला. वृद्ध भिकन मोरे यांना गंभीर दुखापत झाली आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून धाव घेतली, मात्र तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपी मुलाला तात्काळ अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पैशांसाठी रक्ताच्या नात्याचाही विचार न केल्याने समाजमन सुन्न झाले आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.