Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
आंतरराष्ट्रीय

सातारा येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा संपन्न…

Admin • 20 Feb 2026, 06:07 AM

“शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप…”

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत माय भारत (MY Bharat) तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथे आयोजित भव्य “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रेत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून सहभाग नोंदविला.

ही पदयात्रा केवळ एक औपचारिक सोहळा नसून शिवरायांच्या जाज्वल्य विचारांनी प्रेरित असा एक ‘चैतन्य सोहळा’ ठरला. हजारो तरुणांच्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि वातावरणात राष्ट्रप्रेम व शौर्याची भावना जागृत झाली.

याप्रसंगी मा. ना. श्री. शंभुराज देसाई (पालकमंत्री, सातारा), मा. ना. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले (मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. ना. श्री. जयकुमार गोरे (मंत्री, महाराष्ट्र राज्य), आमदार मनोज घोरपडे, सातारा नगरीचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला.

साताऱ्यातील विविध शाळांनी पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लेझीम पथक, घोडेस्वार पथक, गजी नृत्य, दांडपट्टा, मर्दानी खेळ, मलखांब, चित्ररथ तसेच पारंपारिक वेशभूषा व नृत्य सादर करत विद्यार्थ्यांनी शिवकालीन परंपरेचे प्रभावी दर्शन घडविले.

शिवरायांचे आदर्श, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत युवा पिढीत रुजविण्यासाठी हा उपक्रम एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शौर्याच्या पाऊलखुणांनी भारलेली ही ऐतिहासिक पदयात्रा साताऱ्याच्या सांस्कृतिक परंपरेला साजेशी ठरली असून या प्रेरणादायी उपक्रमाचा भाग होण्याचा सार्थ अभिमान व्यक्त करण्यात आला.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.