Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
आंतरराष्ट्रीय

त्रिशुली नदीत प्रवासी बस कोसळली; १८ जणांचा मृत्यू, २६ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी…!

Admin • 23 Feb 2026, 05:59 PM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

नेपाळमध्ये पुन्हा एकदा भीषण रस्ते अपघाताने खळबळ उडाली आहे. राजधानी काठमांडूकडे येणारी प्रवासी बस थेट त्रिशुली नदीत कोसळल्याने १८ जणांचा मृत्यू झाला असून २६ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.सोमवारी (२३ फेब्रुवारी) पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ४४ प्रवाशांना घेऊन पोखराहून काठमांडूकडे जाणारी बस पृथ्वी महामार्गावरून जात असताना धाडिंग जिल्ह्यातील गजुरीजवळ चालकाचा ताबा सुटला. बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या त्रिशुली नदीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवासी नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ६ महिला आणि १२ पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही परदेशी पर्यटकांचाही मृतांमध्ये समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने आणि बचाव पथकांच्या सहाय्याने नदीतून बाहेर काढण्यात आले. जखमींना बोटीने सुमारे एक किलोमीटर अंतरावर आणून त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले.अपघातानंतर घटनास्थळी नेपाळ पोलिस, सशस्त्र पोलिस दल आणि लष्कराच्या पथकांनी संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. मात्र, रात्रीची वेळ, कठीण भौगोलिक परिस्थिती आणि आवश्यक साहित्याचा अभाव यामुळे बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले.सध्या जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, या भीषण अपघातामुळे नेपाळमध्ये रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनावर कठोर पावले उचलण्याचा दबाव वाढत आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.