Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
खानदेश

रावेर तालुक्यात अवैध गोमांस विक्रीचा पर्दाफाश; गोमांस विक्रीवर पोलिसांची धाड; पितापुत्रासह तिघांना अटक….!

Admin • 10 Mar 2026, 01:09 PM

रावेर तालुक्यातील रसलपूर येथे अवैधरीत्या गोवंश कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पितापुत्रासह तिघांना अटक करण्यात आली असून सुमारे ३१ हजार रुपये किमतीचे अंदाजे १७५ किलो गोमांस आणि धारदार सुरे जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रसलपूर गावातील कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकला. या कारवाई दरम्यान शेख युसुफ शेख अय्युब कुरेशी (वय ५०) आणि शेख सानिफ शेख युसुफ कुरेशी (वय २५) हे पिता-पुत्र गोवंश जातीच्या जनावरांचे मांस कापून विक्री करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यातून सुमारे २६ हजार रुपये किमतीचे अंदाजे १३० किलो गोमांस तसेच धारदार कोयता जप्त करण्यात आला. दरम्यान, दुसऱ्या कारवाईत शेख नईम शेख अय्युब कुरेशी हा पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री करताना आढळून आला. पोलिस पथक जवळ येत असल्याचे लक्षात येताच त्याने पळ काढला होता. मात्र पोलिसांनी शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेतले. त्या ठिकाणाहून सुमारे ५ हजार रुपये किमतीचे २५ किलो गोमांस आणि धारदार कोयता जप्त करण्यात आला.

या दोन कारवाईत मिळून सुमारे ३१ हजार रुपये किमतीचे अंदाजे १७५ किलो गोमांस जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आले असून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.

ही कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, अशोक नखाते आणि अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी करत आहेत.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.