Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
खानदेश

आनंदवार्ता ! राज्यात १ एप्रिलपासून वीजदरात कपात, जाणून घ्या नवे दर

Admin • 26 Mar 2026, 11:12 AM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

राज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच वीज दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे. १ एप्रिलपासून हे नवीन दर संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार आहेत. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.राज्यातील प्रमुख वीज वितरण कंपन्यांनी घरगुती वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नव्या दरांची अंमलबजावणी निश्चित करण्यात आली. विशेषतः कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना या कपातीचा अधिक फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ० ते १०० युनिट वीज वापरावर प्रति युनिट ४.३ रुपये आकारले जाणार आहेत. यापूर्वी २०२५-२६ मध्ये याच वापरासाठी ४.७६ रुपये दर होता, म्हणजे सुमारे ९.७ टक्क्यांची घट झाली आहे.१०१ ते ३०० युनिट वीज वापरासाठी आता प्रति युनिट ७.१ रुपये मोजावे लागतील. मागील वर्षी हा दर ७.९६ रुपये होता. त्यामुळे या गटात सुमारे १०.८ टक्क्यांची कपात झाली आहे.३०१ ते ५०० युनिट वापरासाठी नवीन दर ११.६४ रुपये निश्चित करण्यात आला आहे, जो मागील वर्षी १३.५५ रुपये होता. यामध्ये जवळपास १४ टक्क्यांची घट झाली आहे.५०० युनिटपेक्षा जास्त वापरासाठी प्रति युनिट १२.६४ रुपये आकारले जाणार आहेत. यापूर्वी हा दर १४.५५ रुपये होता, म्हणजेच सुमारे १३.१ टक्के कपात झाली आहे.एकूणच, या दरकपातीमुळे राज्यातील विविध वीज वापर गटांतील ग्राहकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.