Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
आंतरराष्ट्रीय

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका; पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर ‘इतक्या’ रुपयांची वाढ, जाणून घ्या दर…!

Admin • 15 May 2026, 05:10 AM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक झटका बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक तणावाचा परिणाम आता थेट भारतातील इंधन दरांवर दिसू लागला आहे.इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. विशेषतः होर्मुज खाडी परिसरातील तणावामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने अनेक देशांमध्ये इंधन संकटाची परिस्थिती निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.नवीन दरानुसार मुंबईत पेट्रोलचा दर 106.50 रुपयांवर तर डिझेलचा दर 93 रुपयांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक, टॅक्सी आणि रिक्षाचालकांमध्ये चिंता वाढली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरण सुरू असून त्याचाही परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होणार असून आगामी काळात मालवाहतूक, भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, टॅक्सी आणि रिक्षा संघटनांकडूनही भाडेवाढीचे संकेत दिले जात आहेत. केंद्र सरकारकडून आजपासून नवीन दर लागू करण्यात आल्याचे बोलले जात असून वाढत्या जागतिक तणावामुळे पुढील काळात इंधन दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.