Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
खानदेश

माफी मागूनही थांबल्या नाहीत धमक्या’; 15 वर्षीय मुलीला बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या

Admin • 04 Aug 2026, 07:21 PM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माफी मागणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला आता बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सततच्या धमक्यांमुळे मुलगी आणि तिच्या आईला काही दिवसांत तब्बल तीन वेळा राहते घर बदलावे लागल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला आहे.वकिलांच्या माहितीनुसार, संबंधित मुलगी अल्पवयीन असून ती सध्या दहावीचे शिक्षण घेत आहे. सोशल मीडियावर तिच्याबाबत पसरवण्यात येणारे वय, नाव आणि व्यवसायासंदर्भातील दावे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुलीची आई एकल पालक असून शिकवण्या घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचे सांगण्यात आले आहे.तक्रारीतील पत्ता सार्वजनिक झाल्यानंतर काही लोक थेट त्यांच्या घरी पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलगी आणि तिच्या आईला जीवे मारण्याच्या तसेच बलात्काराच्या धमक्या दिल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना वारंवार घर बदलावे लागल्याचा दावा वकिलांनी केला आहे.यापूर्वी संबंधित मुलीने व्हिडीओद्वारे देशाची आणि पंतप्रधानांची सार्वजनिक माफी मागितली होती. आंदोलनाच्या वातावरणात इतरांच्या प्रभावाखाली येऊन आपण आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे तिने मान्य केले होते. ही आयुष्यातील पहिली आणि शेवटची चूक असल्याचे सांगत तिने पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचेही स्पष्ट केले होते.या प्रकरणी यापूर्वी झिरो एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सार्वजनिक संदेशातून अल्पवयीन मुलांकडून अशा प्रकारची चूक होऊ शकते, त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगत संयम बाळगण्याचे आवाहन केले होते.दरम्यान , अल्पवयीन मुलीने सार्वजनिकरीत्या माफी मागितल्यानंतरही तिला आणि तिच्या कुटुंबाला बलात्कार व हत्येच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा गंभीर मानला जात आहे. मतभेद असू शकतात, कायदेशीर प्रक्रिया देखील होऊ शकते; मात्र एखाद्या अल्पवयीन मुलीला अशा प्रकारे धमकावणे किंवा हिंसक भाषा वापरणे समाजातील चिंताजनक मानसिकतेकडे बोट दाखवणारे असल्याची चर्चा या घटनेनंतर सुरू झाली आहे. कोणत्याही मतभेदाचे उत्तर कायदा आणि लोकशाहीच्या चौकटीतच असावे, अशी भूमिका अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.