Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
अमळनेर

लाडक्या बहिणींसाठी दिवाळीआधी मोठी अपडेट; दोन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार?

Admin • 08 Oct 2026, 01:37 AM

राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या आगामी हप्त्याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. पात्र महिलांच्या खात्यावर दर महिन्याला १,५०० रुपयांची मदत जमा केली जाते. मात्र सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप खात्यावर जमा झालेला नसल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.ऑगस्ट महिन्याची रक्कम सप्टेंबरच्या अखेरीस लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय स्पष्ट झालेला नाही. दरम्यान, ऑक्टोबर महिनाही सुरू झाल्याने या महिन्याच्या हप्त्याचीही प्रतीक्षा आहे.दिवाळीपूर्वी मिळणार का दुहेरी रक्कम?यंदा नोव्हेंबरमध्ये दिवाळी सण असल्याने रखडलेले दोन्ही हप्ते एकत्रितपणे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सप्टेंबरचा १,५०० रुपयांचा हप्ता आणि ऑक्टोबरचा १,५०० रुपयांचा हप्ता एकाच वेळी जमा झाल्यास लाभार्थींना थेट ३,००० रुपये मिळू शकतात.

मात्र ही रक्कम निश्चितपणे ३,००० रुपये म्हणून जमा होणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे सध्या ही शक्यता असून अंतिम निर्णयासाठी शासनाच्या अधिकृत आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दसऱ्यानंतर हप्ता मिळण्याची शक्यतासप्टेंबरच्या हप्त्याबाबत दसऱ्यानंतर हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्यासाठी शासन निर्णय अर्थात जीआर कधी जारी होतो, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत सप्टेंबरच्या हप्त्याबाबत निर्णय न झाल्यास पुढील वितरणाचे वेळापत्रक आणखी महत्त्वाचे ठरणार आहे.१ कोटी ६६ लाख महिलांना योजनेचा लाभ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख महिला लाभार्थी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आगामी हप्त्याच्या वितरणाचा मोठा आर्थिक परिणाम होणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दोन महिन्यांची रक्कम एकत्र दिली जाणार का, याबाबत आता अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.