Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
अकोला

पत्रकाराला धमकावणाऱ्या वनक्षेत्रपालाविरोधात पत्रकार संघाचा एल्गार !पत्रकार संघाच्या निवेदनाची वनविभागाकडून तातडीने दखल!

Administrator • 13 Nov 2026, 11:23 AM

उपवनसंरक्षकांचे चौकशीचे आदेश, वस्तुस्थिती तपासून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश.

आवाज न्यायाचा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
मालेगाव

वाशिम : वाशिम जिल्ह्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरच शासकीय अधिकाऱ्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या कारभारासंदर्भात बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून पत्रकार सोहेल पठाण यांना वनक्षेत्रपाल संतोष कुरोडे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा तसेच व्हॉट्स ॲपवरून धमकीचे संदेश पाठविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराने जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असतानाच वाशिम जिल्हा पत्रकार संघाने या प्रकरणाविरोधात आक्रमक भूमिका घेत उपवनसंरक्षकांकडे लेखी निवेदन सादर केले.

विशेष म्हणजे, पत्रकार संघाच्या निवेदनाची वनविभागाने तातडीने दखल घेत संबंधित प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती व सत्यता तपासण्याचे आदेश दिल्याने या प्रकरणाला आता प्रशासकीय स्तरावर महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.

पत्रकाराने जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, शासकीय यंत्रणेतील त्रुटी निदर्शनास आणून देणे आणि प्रशासनाला प्रश्न विचारणे हे पत्रकारितेचे मूलभूत कर्तव्य आहे. मात्र, एखादी बातमी प्रसिद्ध झाली म्हणून संबंधित पत्रकाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करणे अथवा धमकीचे संदेश पाठविणे, हा प्रकार पत्रकार संघाच्या मते अत्यंत गंभीर आहे. शासकीय पदाचा वापर करून पत्रकारांवर दबाव निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा ठाम पवित्रा पत्रकार संघाने घेतला आहे. बातमी प्रसिद्ध होताच अधिकाऱ्याचा संताप ?

व्हॉट्स ॲप वरील संदेशांमुळे प्रकरण ऐरणीवर! वनविभागाच्या मेडशी येथील शासकीय लाकूड डेपोच्या कारभारासंदर्भात एका प्रसिद्ध दैनिका मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर

पत्रकार सोहेल पठाण यांना व्हॉट्स ॲपवरून
अश्लील भाषेतील संदेश पाठवून धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित संदेशांचे स्क्रीनशॉट पत्रकार संघाने आपल्या निवेदनासोबत जोडले असून, या डिजिटल पुराव्यांची सत्यता तपासून योग्य ती चौकशी करण्याची मागणी केली आहे. एखाद्या बातमीतील माहितीबाबत संबंधित अधिकाऱ्याला आक्षेप असल्यास त्यासाठी खुलासा देणे, वस्तुस्थिती मांडणे किंवा कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे, असे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, पत्रकाराला शिवीगाळ करणे, धमकी देणे अथवा त्याच्या लेखणीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही. पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही लोकशाही व्यवस्थेतील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे.

पत्रकारांच्या एकजुटीतून प्रशासनाला स्पष्ट संदेश !

या निवेदनावर वाशिम जिल्हा पत्रकार संघाचे माधवराव अंभोरे, विश्वनाथ राऊत, नंदकिशोर शिंदे, अजय ढवळे, विनोद तायडे, सोहेल पठाण, कपिल भालेराव, उमेश बोराटे, अनिस बागवान, सचिन साठे, नवाजिश, इरफान शेख, अजय गायकवाड, सुभाष बळी, महादेव हरणे, ॲड. सुरेश टेकाळे , रमेश उंडाळ, मदन देशमुख, विठ्ठल भागवत, यशवंत पेंढारकर, यशवंत हिवराळे, शिवाजी खडसे, चंद्रकांत गायकवाड, गोरखनाथ भागवत, अजिंक्य मेडशीकर, सुनील कांबळे, राजेंद्र मानधना, प्रा. अरविंद गाभणे, गणेश भालेराव, अतिश देशमुख, पप्पू थुगे, प्रदीप सालवनकर, राम चौधरी आर्दीसह असंख्य पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पत्रकार संघाच्या या सामूहिक भूमिकेतून एकच संदेश देण्यात आला आहे की, पत्रकारितेचा आवाज दाबण्यासाठी धमकी किंवा दबावाचे मार्ग वापरले जात असतील, तर संपूर्ण पत्रकार वर्ग संबंधित पत्रकाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. हा प्रश्न केवळ एका पत्रकाराचा नसून जिल्ह्यातील निर्भीड आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या अस्तित्वाचा आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.