अंतरी खेडेकर च्या शेख दिलावरने जपला आहे, प्राचीन नाण्यांचा अनमोल ठेवा,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी-संजय खेडेकर
चिखली दि.१४ आजच्या आधुनिक काळात जुन्या वस्तूंचे महत्त्व कमी होत असताना तालुक्यातील अंतरी खेडेकर येथील शेख दिलावर या तरुणाने आपल्या जुन्या संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी गेल्या तीनशे वर्षांपासून जुन्या असलेल्या ऐतिहासिक प्राचीन काळातील नाणी संग्रह करण्याचा अनोखा छंद त्याने जोपासला आहे.
त्याचा हा छंद आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तालुक्यातील अंतरी खेडेकर येथील शेख दिलावर नाणे संग्राहक यांचे प्राथमिक शिक्षण अंतरी खेडेकर येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. तर माध्यमिक शिक्षण कै. त्र्यंबक भिकाजी पाटील यांनी स्थापन केलेल्या श्री नेहरू शिक्षण संस्थेमध्ये झाले आहे. नाणे संग्राहक शेक दिलावर पाचव्या वर्गात असताना गृहपाठ अपूर्ण असल्यामुळे शिक्षकांनी त्यांना शिक्षा देण्यासाठी उभे केले. आणि विचारले की गृहपाठ आज का अपूर्ण आहे. दिल्यावरने उत्तर दिले की सर पेन संपला होता. म्हणून सरांनी कंपास घेऊन येण्याचे सांगितले. तर सरांना कंपास मध्ये प्राचीन नाणी आढळून आली. सरांनी म्हटले की मला एक दोन नाणी दे. तर मी त्यांना विचारले तुम्हीही हे नाणे घेऊन काय करणार तर सर म्हणाले, मी हे नाणे घेऊन घरी लहान मुलांना दाखवणार. तेव्हापासून मला नाणे संग्रह करण्याची आवड निर्माण झाली. सन २०१३ पासून नाणे संग्रह करण्याची आवड निर्माण झाली असून आतापर्यंत संग्रहालयात ३०० वर्षापासून ची प्राचीन ऐतिहासिक जवळपास तीन हजार नाणी संग्रही असल्याचे शेख दिलावर सांगतात.
दिलावर शेख यांच्या संग्रहालयात कुशाण, गुप्त, चालुक्य, शुंग, सातवाहन, काबुल शाही साम्राज्याचे, मुघल, मराठा, ब्रिटिश आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्व नाण्यांचा समावेश आहे.महत्त्वाचं म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, सातकर्णी, शिवाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, टिपू सुलतान या सर्व राजे महाराजांची सोन्याची, चांदीची आणि तांब्याची नाणी शेख दिलावर यांच्या संग्रहालयात आहेत.गणपतीची स्मारक असलेली इंडोनेशिया येथील वीस हजार रुपयाची नोट भगवान गौतम बुद्ध यांचे स्मारक असलेली कंबोडिया या देशाची शंभरची नोट, काल्पनिक कागदपत्रे, पोस्ट तिकिटे, अवजारे आणि बरेच काही दुर्मिळ नाणी व नोटा त्यांच्या संग्रहात आहेत.त्यांच्या या ताज प्राचीन नाणी संग्रहालयाला एक तप अर्थात १२ वर्षे पूर्ण झाले आहेत, त्यानिमित्ताने नाणे संग्राहक शेख दिलावर यांच्यावर चौफेर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शाळा, कॉलेज मध्ये भव्य नाण्यांचे प्रदर्शन ते भरवितात. . श्री नेहरू शिक्षण संस्थेचे संचालक शिवशंकर राव खेडेकर, रामभाऊ खेडेकर, संचालिका सोनिया ताई खेडेकर यांनी संस्थेत सत्कार घेतला. कौतुक केले. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी फोन करून घरी येऊन सत्कार केला.या सामाजिक कार्याची दखल घेत ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरम या तीन मंत्रालय मान्यता प्राप्त असलेल्या संस्थांद्वारे नाणे संग्राहक शेख दिलावर यांना साहित्य कला व सांस्कृतिक राष्ट्रीय पुरस्कार २०२४ दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला .विद्यार्थ्यांसाठी परदेशी चलन, २५०० वर्षांपासूनची प्राचीन नाणी, शिवकालीन नाणी यांच्या प्रदर्शनी आयोजित करण्यात येते. शेख दिलावर यांना करन्सी कलेक्टर अवॉर्ड २०२३, साहित्य कला व सांस्कृतिक पुरातन वास्तू राष्ट्रीय पुरस्कार २०२४, संत गाडगे बाबा समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२४, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार २०२५, राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार २०२५, वंदे भारत प्रेरणा पुरस्कार २०२६ आदी विविध पुरस्कार प्राप्त झाले .आहे






