थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी प्रशांत चव्हाण
बुलढाणा -अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याचे स्मरण.
अनाथ, निराधार आणि वंचित मुलांसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ या संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान आहेत. स्वतःच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना करून त्यांनी हजारो अनाथ मुलांना मायेचा आधार दिला. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि निस्वार्थ सेवाभावामुळे त्यांना संपूर्ण देशात ‘अनाथांची माय’ म्हणून ओळख मिळाली.
अनेक अडचणींवर मात करत त्यांनी अनाथ मुलांच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवनाला, त्यागाला आणि समाजसेवेच्या कार्याला विनम्र अभिवादन!
त्यांचे कार्य केवळ इतिहास नाही, तर प्रत्येक पिढीसाठी माणुसकीचा जिवंत आदर्श आहे.






