Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
महाराष्ट्र

सांगली जिल्हा बँकेत नाट्यमय राजकीय घडामोडींत काँग्रेसची बाजी तर भाजपचा फसवणुकीचा गंभीर आरोप !

Administrator • 18 Nov 2026, 05:38 PM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तासंघर्षात अखेर मोठा राजकीय पेच सुटला असून काँग्रेसने बाजी मारली आहे. गेल्या काही दिवसांपासून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सुरू असलेल्या जोरदार रस्सीखेचीला पूर्णविराम देत सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध पार पाडली. यामध्ये काँग्रेसचे महेंद्र आप्पा लाड यांची अध्यक्षपदी, तर शिवसेना पक्षाचे तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निकालानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि मिठाई वाटून मोठा जल्लोष साजरा केला.

या निवडणुकीतील पक्षीय बलाबल पाहता अगोदर बिनविरोध आणि नंतर जिंकलेल्या जागांसह काँग्रेसचे सर्वाधिक सहा संचालक निवडून आले होते. त्याखालोखाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप यांच्याकडे प्रत्येकी पाच जागा आहेत, तर शिंदेंची शिवसेना तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन जागांवर विजयी झाला आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा होती. मात्र काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांनाच नेतृत्व द्यावे लागले. दुसरीकडे, तानाजी पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. तरीही तानाजी पाटील यांना उपाध्यक्षपद मिळाल्याने आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर या दोन्ही नेत्यांचा राजकीय हिशोब चुकल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, निवडीच्या प्रक्रियेवेळी गोपीचंद पडळकर गैरहजर होते आणि निवडणूक संपल्यानंतरच ते सभागृहात दाखल झाले. तर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील बाहेरगावी असल्याने या वेळी उपस्थित राहू शकले नाहीत.

बिनविरोध निवडणूक पार पडल्यानंतरही सांगलीच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी महाविकास आघाडीवर थेट फसवणुकीचा आरोप केला आहे. निवडणूक बिनविरोध करताना आम्हाला सोबत घेतले, पण अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी बाजूला सारून सत्ता स्थापन केल्याचे त्यांनी म्हटले आहे. जयंत पाटील देशाबाहेर असल्याचे कारण देऊन बैठक घेण्यास टाळाटाळ करण्यात आली, तसेच शिवसेना पक्षाने महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोपही सम्राट महाडिक यांनी केला. या घडामोडींमुळे आगामी काळात बँकेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, माजी मंत्री विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी खासदार संजय काका पाटील, राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार आणि माजी अध्यक्ष मानसिंगराव नाईक, शिवसेनेचे नेते अमोल बाबर आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई मोटे यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या बँकेत राजकारण येऊ नये यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूक बिनविरोध केली, त्याबद्दल विश्वजीत कदम यांनी त्यांचे आभार मानले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे राजकारण वेगळे असून, येथे सहकार क्षेत्रात काम करताना राजकारण आणले जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देत नूतन अध्यक्ष महेंद्र आप्पा लाड आणि नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी बिनविरोध निवडीबद्दल सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले.

बँकेची निवडणूक जरी बिनविरोध पार पडली असली, तरी भाजपच्या गंभीर आरोपामुळे सहकारातील सर्वपक्षीय एकीला तडा गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा राजकीय मतभेदांचा परिणाम बँकेच्या कामकाजावर न होता शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च राहावे, हीच सर्वसामान्य सभासदांची अपेक्षा असेल.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.