Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
खानदेश

दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी’होणार;मुख्यमंत्री फडवणीस यांची मोठी घोषणा;

Administrator • 19 Nov 2026, 02:40 PM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे
दि.१९/११/२०२६.

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाला’चैत्यभूमी’हे नाव देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज केली आहे. दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमीं देण्याच्या मागणी संदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच तत्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. मात्र या प्रक्रियेसाठी विधिमंडळाच्या समिती बाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे, त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, त्यानंतर स्थानकाची नामकरण करण्यात येईल. असे, श्री . फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी विविध सुविधा. सुरक्षा. वाहतूक. आरोग्य. आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेखोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले. तसेच दादर रेल्वे स्थानकाला”चैत्यभूमी’हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली, असून केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधिमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधिमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्रींनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा मुख्यमंत्री फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत आढावा घेण्यात आला.

विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ. गृहराज्यमंत्री योगेश कदम. माजी मंत्री संजय बनसोडे. समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे. भाई गिरकर. रेल्वे, मुंबई महापालिका आणि भारतीय बौद्ध महासभा. अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघ, आदी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनासाठी राज्यसह देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येतात, दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मागील वर्षाच्या भावातून निर्दशनास आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, आशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना त्रास होऊ नये, यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निर्देशने, मोर्चे अथवा आंदोलनांना अधिकृतपणे बंदी जाहीर करण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चैत्यभूमी आणि परिसरात शांततापूर्ण, शिस्तबद्ध व श्रद्धापूर्वक वातावरण कायम राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. असेही त्यांनी नमूद केले. वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनात ऑटो रिक्षांना प्रवासाची मर्यादा, भाविकांच्या पुढील प्रवासाची सुविधा आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी पूर्व नियोजित व्यवस्था असावी. रेल्वे. रस्ते वाहतूक. स्थानिक वाहतूक व्यवस्था आणि पोलीस यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून अनुयायांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.या निर्णयाच्या अंमलबजावणीत कुठे अडचण आहे. याची तपासणी करून पुढील पाच ते सात दिवसात आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. इंदु मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्या संदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्यांची भरपाई करण्यास शासन तयार असून उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्रीं फडवणीस यांनी स्पष्ट केले.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.