Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
बुलढाणा

व्हि.बि कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमधील द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांची धरणगाव परिसरात शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Administrator • 23 Nov 2026, 01:58 AM

मलकापूर – करण झनके

मलकापुर:-स्थानिक व्हि.बि कोलते इंजिनिअरिंग कॉलेजच्या द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांने नॅशनल हायवे क्रमांक 53 वर धरणगाव नजीक शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपल्याची घटना आज दि. 22 नोव्हेंबर 26 रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान उघडकीस आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिखली तालुक्यातील पांढरदेव येथील समाधान सुनील म्हस्के मलकापूर शहरातील व्हि.बि.कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दुसऱ्या सत्रासाठी शिक्षण घेत होता. तो मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील गजानन नगरी येथे रूम करून राहत होता. काल सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान त्याने वर्ग मित्राची दुचाकी गाडी घेऊन झेरॉक्स आणायला जातो असे सांगून रुम बाहेर निघाला रात्री दहा वाजे पर्यंत ही तो रुमवर परतला नाही म्हणून त्याच्या रूममधील मित्रांनी याबाबतची माहिती त्याच्या आईवडिलांना दिली. रात्रभर रुमच्या सहकाऱ्यांनी व मित्रांनी त्याचा सर्वत्र शोधाशोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही आज सकाळी त्याचे वडील सुनील म्हस्के,मामा यांनी मलकापूर शहर गाठले, व्हि.बि कोलते कॉलेज परिसरातील सी.सी.टीव्ही कॅमेरे व शहरातील सि.सि टिव्ही कॅमेरे पाहिले असता तो काल सायंकाळी कॉलेज समोरून धरणगाव कडे जाताना दिसला, नॅशनल हायवे क्रमांक 53 वर धरणगाव समोर फौजी ढाब्यानजीक त्याने नेलेली दुचाकी उभी दिसल्याने शेतात शोध घेतला असता त्याने झाडाच्या फांदीला गळफास घेतला असल्याचे निदर्शनास आले.शहर पोलिस उपनिरीक्षक सतीश बेले यांनी पंचनामा करून त्याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.घटनेची माहिती मिळता बरोबर माजी नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,व्हि.बि. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राचार्य अनिल खर्चे,युगेश खर्चे, माजी नगरसेवक गजानन सोनोने उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले.पोलीस पंचनाम्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.