Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
अकोला

सामाजिक कार्याचा गौरव! नितीनदादा ऊर्फ बंटी जैन यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

Administrator • 23 Nov 2026, 02:25 PM

मुक्ताईनगरचे नगरसेवक नितीनदादा ऊर्फ बंटी जैन यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित!

सामाजिक कार्याची राज्यस्तरावर दखल! नितीनदादा जैन यांचा शेगाव येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव

शेगाव येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान; मुक्ताईनगरसह जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : धार्मिक, सामाजिक, व्यापारी आणि सार्वजनिक जीवनात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे मुक्ताईनगरचे नगरसेवक श्री. नितीनदादा ऊर्फ बंटी जैन यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या पावन भूमीत २२ नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे मुक्ताईनगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

निसर्ग मित्र समिती आणि मातृ-पितृ आचार्य स्मृती जागरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथील वर्धमान जैन सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्राचार्य बी. एस. पाटील, संस्थेचे संस्थापक डॉ. प्रेमकुमार अहिरे, संतोष आबा पाटील, डॉ. विनोद पाटील, विलास देसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत नितीनदादा जैन यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. खुशबू जैन यांचीही उपस्थिती होती.

सामाजिक बांधिलकीतून जनसेवेचा प्रवास!

नितीनदादा ऊर्फ बंटी जैन हे केवळ नगरसेवक म्हणूनच नव्हे, तर सामाजिक, धार्मिक आणि व्यापारी क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उभारलेली आंदोलने असोत किंवा व्यापारी वर्गाच्या अडचणी सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न असोत, त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी नगरसेवक म्हणून ते सक्रिय भूमिका बजावत आहेत.

जैन समाजाच्या श्रमण संघाच्या जिल्हा कार्यकारिणीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवत समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. सार्वजनिक प्रश्नांवर आवाज उठविणे, नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि समाजहिताच्या उपक्रमांना प्राधान्य देणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये मानली जातात.

मान्यवरांची उपस्थिती आणि पुरस्कार वितरण सोहळा

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य दादासो बी. एस. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून सीआयडी पोलीस अधिकारी तथा ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे (अहिल्यानगर), ज्येष्ठ पत्रकार तथा आदर्श शेतकरी सुभाष बिंदवाल, निसर्ग मित्र समितीचे संस्थापक डॉ. प्रेमकुमार अहिरे, प्राचार्य डॉ. अजितकुमार जयस्वाल, बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्राचार्य अरुण आराख, अकोला जिल्हाध्यक्ष मनीष दिनकरराव खर्चे, प्राचार्य आर. एन. पाटील, निसर्ग मित्र समितीचे राज्य महासचिव संतोषराव आबा पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष प्राचार्य राजेंद्र राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

मुक्ताईनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा!

नितीनदादा जैन यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याची बातमी समोर येताच मुक्ताईनगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुक्ताईनगरचे आमदार मा. श्री. चंद्रकांत भाऊ निंबाजी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सामाजिक कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली जाणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. मात्र, पुरस्कार हा केवळ सन्मान नसून भविष्यातील सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा असतो. नितीनदादा जैन यांच्या या गौरवामुळे मुक्ताईनगरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनाही निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

सामाजिक बांधिलकी, जनतेच्या प्रश्नांसाठीची तत्परता आणि समाजहिताचा ध्यास यांचा गौरव म्हणजे नितीनदादा जैन यांना मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान होय!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस आवाज न्यायाचा, बुलंद आवाज जनतेचा!

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.