Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
खानदेश

रावेर नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनातून निम्मी रक्कम वसूल केल्याचा गंभीर आरोप; सामूहिक कामगारांनी पोलीसांना दिले तक्रारी निवेदन !धनादेशाद्वारे पैसे काढणे, रोख रक्कम परत घेणे, धमकी व आर्थिक शोषणाची चौकशी करून संबंधितांवर FIR दाखल करण्याची मागणी

Administrator • 23 Nov 2026, 04:33 PM

रावेर : रावेर नगरपरिषदेतील अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील कंत्राटी कामगारांच्या वेतनातून कथितरीत्या निम्मी रक्कम परत घेतली जात असल्याच्या गंभीर प्रकरणी कामगारांनी रावेर पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक फौजदारी तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात आर्थिक शोषण, फसवणूक, बेकायदेशीर वसुली, धमकी, संगनमत आणि संभाव्य फौजदारी गुन्ह्यांचा आरोप करण्यात आला असून संबंधित व्यक्तींविरुद्ध तात्काळ FIR दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, नगरपरिषदेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांच्या सॅलरी खात्यात वेतन जमा झाल्यानंतर धनादेशाद्वारे फैजान अली व नदिम शेख यांच्या नावाने रक्कम काढली जात असल्याचा आरोप आहे. तसेच मुन्ना अग्रवाल यांच्या एम. जे. मार्केट येथील खाजगी कार्यालयात कामगारांना बोलावून त्यांच्या वेतनातील निम्मी रक्कम रोख स्वरूपात परत दिली जात असल्याचे कामगारांनी तक्रारीत नमूद केले आहे. पूर्ण वेतनाची मागणी केल्यास कामावरून कमी करण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

ज्या कामगारांचे बँक खाते उघडण्यात आलेले नव्हते, अशा कामगारांना अग्निशामक दलाच्या कार्यालयात नगरपरिषदेचे कर्मचारी गणेश रणशिंगे व नितेश चांगरे यांच्या माध्यमातून वेतनातील निम्मी रक्कम रोख स्वरूपात दिली जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण व्यवहारामागे कोणाचा सहभाग आहे, आर्थिक लाभ कोणाला होत आहे आणि मुख्य सूत्रधार कोण आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

कामगारांच्या मेहनतीचा पूर्ण मोबदला मिळणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार असताना, वेतनातून कथितरीत्या रक्कम परत घेणे हा कामगारांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर घाला असून त्यांच्या हक्कांची पायमल्ली असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील बँक व्यवहार, धनादेश, वेतनपत्रक, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल संदेश आणि अन्य आर्थिक पुरावे सुरक्षित करून निष्पक्ष तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, तक्रारदार कामगार हे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील असून त्यांच्यावर जातीय हेतूने आर्थिक शोषण, धमकी, दबाव अथवा अपमान करण्यात आला आहे का, याची तपासणी करून, तसे पुरावे आढळल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसारही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

कामगारांना धमकावणे, नोकरीवरून कमी करण्याचा दबाव आणणे किंवा तक्रार मागे घेण्यासाठी त्रास देणे असे प्रकार होऊ नयेत, यासाठी तक्रारदार कामगारांना संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सदर सामूहिक तक्रारीत संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करून मुख्य सूत्रधारासह सर्व सहभागी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, कामगारांच्या वेतनातून कथितरीत्या वसूल करण्यात आलेली रक्कम परत मिळवून द्यावी आणि या प्रकरणात तातडीने FIR दाखल करून सखोल तपास सुरू करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

कामगारांच्या हक्काच्या वेतनावर गदा आणणाऱ्या कथित आर्थिक शोषणाचा पर्दाफाश करून पीडित कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आता पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.