Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
बुलढाणा

दुष्काळी परिस्थितीत हळद पिकाच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन व संवाद मेळावा; हळद उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनक

Administrator • 23 Nov 2026, 04:52 PM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव : दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हळद पिकाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासह उत्पादनवाढीसाठी हळद उत्पादक शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने मेहकर येथे हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता मार्केट रोड, मेहकर येथील भूमिपुत्र शेतकरी भवन येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. नितेंद्र कदम हे दुष्काळी परिस्थितीत हळद पिकाचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील विभागप्रमुख डॉ. हरिहर कोरसकर हे हळद पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

दुष्काळी परिस्थितीत हळद पिकाचे नियोजन, पिकाचे व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती या मेळाव्यातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधीही यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत शास्त्रीय माहिती व मोलाचे मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.

मेहकर व परिसरातील सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांनी या मार्गदर्शन व संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.