Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
जळगावा जिल्हा

25 मे नंतर मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज ” उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता!

Admin • 18 May 2026, 09:46 AM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

जळगाव गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या तीव्र झळा आणि ४४ ते ४५ अंशांच्या प्रचंड तापमानामुळे अक्षरशः भाजून निघालेल्या जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत जिल्ह्याचा पारा ३९ अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यात पुढील आठवडाभर जरी पावसाची चिन्हे नसली, तरी तापमानात होणाऱ्या या लक्षणीय घटीमुळे नागरिकांची भीषण उकाड्यापासून सुटका होणार आहे. याशिवाय ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे उष्णतेपासून मोठा दिलासा देतील.हवामान अभ्यासकांच्या मते, तापमानात अचानक झालेल्या या बदलामागे वाऱ्यांची बदललेली दिशा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.राजस्थानच्या वाळवंटी भागाकडून येणाऱ्या या अतिउष्ण वाऱ्यांमुळे जिल्हा होरपळून निघाला होता. मात्र, आता पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची स्थिती झाली आहे. जळगावकडे येणारे वारे आता थेट अरबी समुद्राकडून येण्याची शक्यता आहे. या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आणि अंशतः ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा वेगाने खाली येईल.जळगाव जिल्ह्यात पुढील सात दिवस पावसाची शक्यता कमी असली, तरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जळगावकरांची पावसाचीही प्रतीक्षा संपणार आहे. २५ मे नंतर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्यात चांगल्या मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.