Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
बुलढाणा

सर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:

Administrator • 24 Nov 2026, 03:46 PM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे
दि.२४/११/२०२६

सर्व सामान्य जनतेचे प्रलंबित मूलभूत प्रश्न आणि गावकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय भाई वानखडे यांच्या नेतृत्वाखाली संग्रामपूर तहसील कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या उदासीन धोरणाविरोधात पुकारलेले हे आंदोलन रात्री उशिरा पर्यंत सुरूच असून, आता माघार नाही’असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

आंदोलनाची पार्श्वभूमी आणि मागण्या;
संग्रामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक आणि कष्टकरी वर्गाला अनेक मूलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही सर्वसामान्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यानंतर सेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस आश्वासन आणि मागणीची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत हे धरणे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा विजय भाऊ वानखडे यांनी दिला आहे.

रात्री उशिरापर्यंत ठिय्या:
तहसील कार्यालय परिसरात मंडप टाकून सुरू असलेल्या या आंदोलनात परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाली आहेत. दिवसभर चाललेले हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आले असून, आंदोलकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात तणावपूर्ण शांतता असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.