जालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शन

मशरूम शेतीतून रोजगार व स्वयंरोजगाराची संधी होणार उपलब्ध
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी-संजय खेडेकर
चिखली दि.२४ (प्रतिनिधी) जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या स्वराज मशरूम फार्म पाथरवाला खुर्द येथे येत्या ६ डिसेंबर २०२६ रोजी रविवारी सकाळी १० वा. मशरूम (आळंबी) उत्पादन व मशरूम शेतीविषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून उद्योजिका विद्याताई उजेड मार्गदर्शन करणार आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गटातील सदस्य, युवक तसेच शेतीपूरक व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
अलीकडच्या काळात मशरूम उत्पादन हा शेतीला जोडधंदा म्हणून एक चांगला पर्याय पुढे येत आहे. कमी जागेत आणि योग्य नियोजनातून मशरूमचे उत्पादन घेता येत असल्याने ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.
या प्रशिक्षणामध्ये मशरूम उत्पादनासाठी आवश्यक साहित्य, लागवडीची पद्धत, मशरूमच्या वाढीसाठी पोषक वातावरण, देखभाल, उत्पादन प्रक्रिया, काढणी तसेच विक्री व्यवस्थापन याविषयी मशरूम उत्पादक उद्योजिका विद्याताई उजेड मार्गदर्शन करणार आहे. तसेच मशरूम व्यवसाय सुरू करताना घ्यावयाची काळजी आणि आर्थिकदृष्ट्या हा व्यवसाय कसा फायदेशीर ठरू शकतो, याबाबतही माहिती दिली जाणार आहे.
ग्रामीण भागातील बेरोजगार युवक, शेतकरी, महिला आणि नवउद्योजकांनी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक शेतीपूरक व्यवसायांकडे वळावे, या दृष्टीने या प्रशिक्षणाचे विशेष महत्व आहे.
या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने प्रशांत हर्षे मो.९३७०६२०९८९ यांनी केले आहे.
Related
खानदेशमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्र...
खानदेशमयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या म...
बुलढाणासावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह...
खानदेश

