सावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : तालुक्यातील सावखेड भोई शिवारातील शेतातील विहिरीत बसविलेली तीन एचपी क्षमतेची टेसमो कंपनीची मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी समाधान सोनाजी जाधव (वय ६१, रा. सावखेड भोई) यांच्या गट क्रमांक ३१९ मधील ६० आर शेतजमिनीवरील विहिरीत शेतीला पाणी देण्यासाठी मोटार बसविण्यात आली होती. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ते शेतात गेले असता विहिरीवरील मोटारीची वायर व पाइप कापलेले दिसून आले. विहिरीत पाहणी केली असता मोटार चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
२१ नोव्हेंबर रोजी रात्री ७ ते २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने १६ हजार ८०० रुपये किमतीची मोटार चोरून नेल्याची तक्रार आहे. याप्रकरणी २४ नोव्हेंबर रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा क्रमांक ५३४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.
Related
खानदेशमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्र...
खानदेशमयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या म...
खानदेशजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे ...
खानदेश

