Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
खानदेश

फळपिक विम्याचा शेतकऱ्यांना दिलासा; हेक्टरी ८५ हजारांपर्यंत भरपाई मंजूर

Admin • 02 Oct 2026, 11:36 AM

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा होणार

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-

आंबिया बहार फळपिक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत अति अधिक व कमी तापमानामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना महसूल मंडळनिहाय हेक्टरी फळपिक विमा मंजूर झाला आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांना फळपिक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली महसूल मंडळात केळी पिकासाठी हेक्टरी ८५ हजार रुपये, घोडसगाव व कुऱ्हा महसूल मंडळात केळीसाठी ७४ हजार ६७९ रुपये मंजूर झाले आहेत. कुऱ्हा मंडळातील संत्रा पिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये, तर निमखेडी बुद्रुक महसूल मंडळातील केळी पिकासाठी हेक्टरी ७४ हजार ६७९ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

रावेर तालुक्यातील ऐनपूर व खिर्डी महसूल मंडळात केळी पिकासाठी हेक्टरी ८५ हजार रुपये, सावदा मंडळात ५२ हजार ८२१ रुपये, तर निंभोरा महसूल मंडळात केळी पिकासाठी हेक्टरी ८५ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

बोदवड तालुक्यातील बोदवड, साळशिंगी व शेलवड महसूल मंडळात केळी पिकासाठी हेक्टरी ७४ हजार ६७९ रुपये विमा मंजूर झाला आहे.

अति अधिक व कमी तापमानामुळे फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या मंजुरीमुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत विमा रकमेचे वितरण सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.