जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला तेलांजली – स्थानिक पशुधन आधी, बाहेरच्यांना प्रवेशबंदी! जळगाव जिल्ह्यात ३.३४ लाख पशुधनाच्या चारा संरक्षणासाठी प्रशासनाचा कठोर निर्णय!

जिल्ह्यातील स्थानिक पशुधनाच्या चाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असला, तरी प्रशासनासमोर खरे आव्हान आता सुरू झाले आहे. जिल्ह्याच्या सीमा, ग्रामीण रस्ते आणि गावांच्या हद्दीतून बाहेरील पशुधनाची आवक रोखण्यासाठी नेमकी कोणती यंत्रणा कार्यरत राहणार? आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोण कारवाई करणार? तसेच स्थानिक पशुपालकांना चारा उपलब्धतेबाबत काही अडचण निर्माण झाल्यास त्यावर उपाययोजना कोण करणार?
हे प्रश्न अनुत्तरित राहता कामा नयेत.
प्रशासनाने केवळ आदेश काढून जबाबदारी पूर्ण झाल्याचे समजू नये. प्रत्यक्ष क्षेत्रात पथके तैनात करून नियमित तपासणी, स्थानिक पशुपालकांशी संवाद आणि चारा उपलब्धतेचा आढावा घेणे आवश्यक आहे. कारण पशुधन वाचले तरच शेतकऱ्यांचा शेतीपूरक आर्थिक आधार टिकेल.
स्थानिक पशुधनाचे संरक्षण ही प्रशासनाची जबाबदारी आहे; त्यामुळे आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करून पशुपालकांना दिलासा देणे आता प्रशासनासाठी खरी कसोटी ठरणार आहे!
Related
खानदेशमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्र...
खानदेशमयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या म...
बुलढाणासावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह...
खानदेश

