३५ वर्षांची अविरत आरोग्यसेवा! पाटील हॉस्पिटल ठरले मुक्ताईनगरकरांच्या विश्वासाचे आरोग्यधाम!

आरोग्यसेवेपासून शिक्षणसेवेपर्यंत डॉ. जगदीश पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास; माणुसकी, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम!
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
समाजात काही व्यक्ती आपल्या पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर आपल्या कार्यामुळे लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करतात. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे डॉ. जगदीश पाटील! आरोग्यसेवा, शिक्षणसेवा आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या डॉ. पाटील यांच्या पाटील हॉस्पिटलच्या सेवेला ३५ वर्षांचा प्रदीर्घ टप्पा पूर्ण होत आहे. हा केवळ एका रुग्णालयाचा प्रवास नाही, तर हजारो कुटुंबांच्या विश्वासाचा, आपुलकीचा आणि माणुसकीचा इतिहास आहे.
८ नोव्हेंबर १९९१ : मुक्ताईनगरच्या आरोग्यसेवेतील ऐतिहासिक पाऊल!
त्याकाळी ईदलाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुक्ताईनगर शहरात ८ नोव्हेंबर १९९१ रोजी डॉ. जगदीश पाटील यांनी पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यसेवेचा नवा अध्याय सुरू केला. तत्कालीन आमदार एकनाथराव खडसे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. जी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत या रुग्णालयाचे उद्घाटन झाले होते.
त्या काळात मुक्ताईनगर आणि परिसरातील ग्रामीण भागात पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. रुग्णांना उपचारांसाठी जळगाव, भुसावळ किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत असे. अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांना आपल्या परिसरातच वैद्यकीय उपचार मिळावेत, या उदात्त हेतूने डॉ. जगदीश पाटील यांनी पॉलीक्लिनिक आणि रुग्णालय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
स्त्रीरोग, जनरल सर्जरी, अस्थिरोग, बालरोग, नेत्ररोग, त्वचारोग अशा विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देत त्यांनी मुक्ताईनगरच्या आरोग्यव्यवस्थेला नवी दिशा दिली. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा दिलासा निर्माण झाला.
रुग्णसेवा म्हणजे व्यवसाय नव्हे, तर माणुसकीचे व्रत!
गेल्या साडेतीन दशकांत पाटील हॉस्पिटलने अनेक रुग्णांना उपचार आणि आधार दिला. माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देताना रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करण्याची भूमिका डॉ. जगदीश पाटील यांनी जपली. त्यांच्या कार्यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णाकडे केवळ एक केस म्हणून नव्हे, तर आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून पाहण्याची वृत्ती!
रुग्णाला पुढील उपचारांसाठी जळगाव, मुंबई किंवा अन्य मोठ्या शहरात जाण्याची गरज भासल्यास योग्य मार्गदर्शन करणे, उपचारांची दिशा दाखविणे आणि आवश्यक सहकार्य करणे, ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे.
जात, धर्म, पक्ष, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाशी आपुलकीने वागणे, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे. दिवस असो वा रात्र, गरज पडल्यास मध्यरात्रीही रुग्णसेवेसाठी उपलब्ध राहण्याची त्यांची तत्परता अनेकांसाठी विश्वासाचा आधार ठरली आहे.
आरोग्यसेवेबरोबर शिक्षणक्षेत्रातही दूरदृष्टीचा ठसा!
डॉ. जगदीश पाटील यांचे कार्य केवळ आरोग्यसेवेपुरते मर्यादित राहिले नाही. शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे खरे साधन आहे, ही जाणीव ठेवून त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी पुढाकार घेतला.
सन २००० मध्ये तालुक्यातील पहिली इंग्रजी माध्यमाची स्टेट बोर्डाची शाळा, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्याचा मान त्यांनी मिळविला. त्यानंतर सन २००८ मध्ये दिल्ली बोर्डाची डॉ. जगदीश पाटील सीबीएसई स्कूल मुक्ताईनगर शहरात सुरू करून शिक्षणक्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले.
स्टेट बोर्ड आणि सीबीएसई अशा दोन्ही शैक्षणिक प्रवाहांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. विशेष म्हणजे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, ही त्यामागील सामाजिक भूमिका महत्त्वाची आहे.
राजकारणापलीकडे माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व!
डॉ. जगदीश पाटील राजकीय क्षेत्रात सक्रिय असले, तरी त्यांचे सामाजिक संबंध कोणत्याही पक्षाच्या चौकटीत अडकलेले नाहीत. विविध पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्याशी ते आपुलकीने व सन्मानाने वागतात.
योग्य ठिकाणी मार्गदर्शन करणे, आवश्यक असेल तेव्हा स्पष्टपणे भूमिका मांडणे आणि एखाद्याची चूक लक्षात आल्यास ती सुधारण्यासाठी सल्ला देणे, हा त्यांच्या स्वभावाचा विशेष पैलू आहे. सुख-दुःखाच्या प्रसंगी लोकांच्या पाठीशी उभे राहणे, सामाजिक प्रश्नांवर संवाद साधणे आणि गरजूंना मदतीचा हात देणे, यामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
३५ वर्षांचा प्रवास : विश्वासाची कमाई हीच खरी संपत्ती!
आज वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान, मोठमोठ्या इमारती आणि महागड्या उपचारपद्धतींचे महत्त्व वाढत आहे. मात्र या स्पर्धेच्या काळातही रुग्णांशी जिव्हाळ्याचे नाते जपणे, माफक दरात सेवा देण्याची भूमिका ठेवणे आणि माणुसकीला प्राधान्य देणे, हेच खऱ्या सेवाव्रती व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे.
पाटील हॉस्पिटलच्या ३५ वर्षांच्या प्रवासाकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे एखादी संस्था मोठी होण्यासाठी केवळ सुविधा पुरेशा नसतात; तर त्यामागे समर्पित विचार, सातत्यपूर्ण परिश्रम आणि लोकांचा विश्वास आवश्यक असतो.
आरोग्यसेवेबरोबर शिक्षणक्षेत्रातही योगदान देत डॉ. जगदीश पाटील यांनी मुक्ताईनगरच्या सामाजिक आणि शैक्षणिक वाटचालीत आपला सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करणे म्हणजे समाजासाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्या सेवाभावी वृत्तीचा सन्मान करणे होय.
हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा!
डॉ. जगदीश पाटील यांच्या आरोग्यसेवा, शिक्षणसेवा आणि सामाजिक कार्याला मनःपूर्वक सलाम! त्यांच्या हातून यापुढेही असेच समाजोपयोगी कार्य घडत राहो, त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, हीच आई मुक्ताईच्या चरणी प्रार्थना!
३५ वर्षांच्या या सेवाप्रवासाबद्दल डॉ. जगदीश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!
Related
खानदेशमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्र...
खानदेशमयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या म...
बुलढाणासावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह...
खानदेश

