Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
आंतरराष्ट्रीय

भालगाव येथे कठीण चिवरदानोत्सव उत्साहात संपन्नबौद्ध बांधवांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात कार्यक्रम पार पडला

Administrator • 16 Nov 2026, 04:18 AM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी-संजय खेडेकर

चिखली दि.१६ (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या भालगाव येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा जागर आणि बौद्ध परंपरेचा वारसा जपणारा कठीण चिवरदानोत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात दि.१५ नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडला.
चिखली शहरातून नागसेन बुद्ध विहार या ठिकाणावरून रॅलीस सुरुवात झाली होती. ठिकठिकाणी या रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी चिखली च्या आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी रॅलीचे स्वागत केले. भालगाव येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूजनीय भंते बोधिपालो महा स्थिर हे होते.

या चिवरदानोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील बौद्ध बांधव, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बौद्ध धर्मातील दानपारमितेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कठीण चिवरदान ही बौद्ध धर्मातील प्राचीन आणि महत्त्वपूर्ण परंपरा असून, वर्षावास पूर्ण केल्यानंतर भिक्खू संघाला चिवरदान करण्याची प्रथा आहे.
यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणुकीनुसार मैत्री, करुणा, प्रज्ञा, शील आणि धम्म उपदेशानेच समता या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच समाजामध्ये बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी बुद्ध विचारांची आजच्या काळातही नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
धार्मिक विधी, बुद्ध वंदना आणि धम्म ओळख माध्यमातून कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. या उत्सवामुळे भालगाव परिसरात बौद्ध संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडले. या कार्यक्रमाला भालगाव येथील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील उपासक उपाशीका मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी भोजनदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.