Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
बुलढाणा

देऊळगाव राजा पोलिसांचा सिनगाव जहांगीर येथे छापा; १ किलोहून अधिक गांजा जप्त

Administrator • 17 Nov 2026, 08:22 AM

गांजा विक्री करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धावर पोलिसांची कारवाई; ३० हजारांचा गांजा जप्त, एकास अटक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथे बेकायदेशीररीत्या गांजा जवळ बाळगून विक्री करणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धावर देऊळगाव राजा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १ किलो ६८ ग्रॅम गांजा सदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत ३० हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिनगाव जहांगीर येथील रहिवासी रमेश रोडुबा सानप (वय ६५) हा आपल्या घरातून गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती देऊळगाव राजा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी पहाटे १.१५ ते २.३० वाजेच्या दरम्यान पोलिसांनी महसूल विभागाचे राजपत्रित अधिकारी, शासकीय पंच, फोटोग्राफर आणि वजन काटा धारकांसह आरोपीच्या घरावर छापा टाकून झडती घेतली.

या घरझडतीदरम्यान घरात एका तपकिरी रंगाच्या थैलीमध्ये १ किलो ६८ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगलेला आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन गणेशराव मिंड यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आरोपी रमेश सानप याच्याविरुद्ध

एन.डी.पी.एस. (NDPS) कायदा कलम २० (b) (ii), ८ (c) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट आणि तपास

घटनेची माहिती मिळताच मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (प्रभार देऊळगाव राजा) संतोष खाडे, सिंदखेड राजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (प्रभार देऊळगाव राजा) आशिष इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक आशिष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता कुवारे या करीत आहेत.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.