Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
खानदेश

मुक्ताईनगर येथे शहीदे वतन शेर-ए-हिंद हजरत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

Administrator • 21 Nov 2026, 12:39 AM

मुक्ताईनगर, दि. 20 नोव्हेंबर : रहेनुमा सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय मुक्ताईनगर येथे शहीदे वतन, शेर-ए-हिंद हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
हजरत टिपू सुलतान यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1750 रोजी कर्नाटकातील देवनहळ्ळी येथे झाला. त्यांचे वडील हैदर अली हे म्हैसूर संस्थानाचे शासक होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी म्हैसूर संस्थानाची धुरा सांभाळली. इंग्रजांच्या साम्राज्यवादी विस्ताराला प्रखर विरोध करणारे ते पराक्रमी शासक होते. इंग्रजांविरुद्ध झालेल्या चार म्हैसूर युद्धांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.टिपू सुलतान हे केवळ शूर योद्धेच नव्हते, तर दूरदृष्टी असलेले कुशल प्रशासक आणि आधुनिक युद्धतंत्राचे पुरस्कर्ते होते. त्यांनी युद्धामध्ये लोखंडी आवरण असलेल्या रॉकेट तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. शेती, व्यापार, उद्योगधंदे, रेशीम उद्योग आणि सैन्यव्यवस्थेच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले.
4 मे 1799 रोजी श्रीरंगपट्टणच्या युद्धात इंग्रज सैन्याशी लढताना त्यांनी वीरमरण पत्करले. शरणागती पत्करण्याऐवजी रणांगणात लढण्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या टिपू सुलतान यांचे शौर्य भारतीय इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांच्या जीवनातून देशप्रेम, स्वाभिमान, धैर्य आणि मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा मिळते.
“गीदड की सौ साल जिंदगी से… शेर का एक दिन बेहतर है…”
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हजरत टिपू सुलतान यांचा इतिहास केवळ एका शासकाच्या पराक्रमापुरता मर्यादित नसून तो संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाची प्रेरणादायी गाथा आहे. आजच्या काळात त्यांच्या जीवनातील देशप्रेम, एकता, बंधुभाव आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. समाजात धर्म, जात आणि पंथ यापलीकडे जाऊन प्रेम, शांतता आणि भाईचारा टिकविणे हाच त्यांच्या विचारांना खरा मानाचा मुजरा ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमास रहेनुमा सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय चे अध्यक्ष हकीम आर.चौधरी, सचिव कलीम मनियार,युनूस हाजी, हमीद मणियार, शफीक मणियार, वसिम चौधरी, रज्जाक मणियार, रिजवान चौधरी आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साहपूर्ण व शांततामय वातावरणात पार पडला.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.