मलकापूरमध्ये अवैध लाकूड वाहतुकीचा संशय; दिवस-रात्र सुरू असलेल्या वाहतुकीला कोणाचे अभय?

वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; संबंधित वाहतुकीची सखोल चौकशी करण्याची मागणी!
मलकापूर | प्रतिनिधी
मलकापूर शहर व परिसरात लाकडाची वाहतूक दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. या वाहतुकीसाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेतल्या आहेत का? लाकूड नेमके कुठून आणले जाते? वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे वैध कागदपत्रे आहेत का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळेत लाकडाची वाहतूक सुरू असल्याने वनविभागाच्या नियंत्रण व तपासणी यंत्रणेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. या वाहतुकीमागे नेमके कोण आहे? संबंधितांना कोणाचे अभय आहे का? की ही वाहतूक सर्व नियमांचे पालन करून केली जात आहे? याची वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक आहे.
वनविभागाने मलकापूर शहरासह परिसरातील लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी. लाकडाचा स्रोत, वाहतूक परवाने, वाहनांची कागदपत्रे आणि संबंधित व्यापाऱ्यांची चौकशी करावी. अवैध वाहतूक आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.
दिवसा-रात्री सुरू असलेल्या या लाकूड वाहतुकीकडे वनविभागाचे लक्ष आहे का? संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे का?
आता वनविभाग यावर काय कारवाई करतो, याकडे मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे.
हॅलो मलकापूरचा सवाल — लाकूड वाहतूक नियमानुसार सुरू आहे की नियमांना बगल देऊन? प्रशासनाने सत्य जनतेसमोर आणावे!
Related
खानदेशमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्र...
खानदेशमयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या म...
बुलढाणासावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह...
खानदेश

