Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
खानदेश

चिखली तालुक्यात दुष्काळ संघर्ष यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकऱ्यांचे प्रेम पाहून पदाधिकारी-कार्यकर्ते भारावले!

Administrator • 23 Nov 2026, 03:19 AM

दुष्काळाने हात रिकामे केले, पण रविकांत तुपकरांवरील विश्वास कायम; पक्षीय झेंडे बाजूला ठेवून शेतकरी एल्गार महामोर्चात सहभागी होण्याचे विनायक सरनाईक यांचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी-संजय खेडेकर

चिखली दि.२३ मलकापूरपासून सुरू झालेली दुष्काळ संघर्ष यात्रा गावागावांत शेतकऱ्यांच्या वेदना, संताप आणि संघर्षाची जिद्द जागवत आहे. सरकारच्या धोरणांनी शेतकऱ्यांना दुष्काळ, कर्ज, पिकांचे नुकसान, पीकविमा आणि नुकसानभरपाईच्या प्रश्नांनी चारही बाजूंनी घेरले असून, शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे.

यात्रेच्या सातव्या दिवशी चिखली तालुक्यातील वैरागड, उदयनगर, अमडापूर, कारखेड, पिंपरखेड, इसोली आणि धानोरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत रविकांत तुपकर यांनी शासनाच्या धोरणांवर जोरदार प्रहार केला.


धानोरीतील स्वागताने भारावले पदाधिकारी-कार्यकर्ते!

धानोरी गावात गावभर रांगोळ्या, घरोघरी महिला भगिनींचे औक्षण, कापूस-सोयाबीनच्या राशींचे रविकांत तुपकरांच्या हस्ते पूजन आणि शेतीच्या औजारांचे पूजन करून जंगी मिरवणुकीत स्वागत करण्यात आले.

दुष्काळामुळे आर्थिक संकट असतानाही यात्रा दोन ते तीन तास उशिरा पोहोचून ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी व्यक्त केलेले प्रेम, उत्स्फूर्त स्वागत आणि जिव्हाळा पाहून रविकांत तुपकर भावुक झाले होते तर यात्रेतील पदाधिकारी व कार्यकर्ते भारावून गेले. दुष्काळाने हात रिकामे केले असले तरी रविकांत तुपकरांवरील विश्वास आणि प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. यावेळी धानोरी ग्रामस्थांचे विनायक सरनाईक यांनी मनःपूर्वक आभार मानले.

कर्जमाफी झाली, तरी पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात!

कर्जमाफी होऊनही वैयक्तिक कर्जाचा बोजा दाखवून बँका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. दुष्काळात शेतकऱ्यांची बँकांकडून होणारी अडवणूक आणि सरकारची आश्वासनांची बोलबच्चन भूमिका असह्य झाली आहे. हा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा बँकांच्या मनमानीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

पक्षीय झेंडे बाजूला ठेवा; शेतकरी म्हणून एकत्र या!

जिल्हा केंद्रीय बँकेच्या निवडणुकीत सर्व नेते स्वतःच्या हितासाठी एकत्र आले, संचालक मंडळ स्थापन केले; मग शेतकरी प्रश्नांवर एकत्र येण्यास अडचण काय? असा सवाल विनायक सरनाईक यांनी केला. नेते आपल्या हितासाठी एकत्र येतात, तर आपण आपल्या मातीसाठी, शेतीसाठी आणि हक्कांसाठी पक्षीय झेंडे बाजूला ठेवून शेतकरी-शेतमजूर म्हणून एकत्र आले पाहिजे, असे आवाहन केले.

रविकांत तुपकर पायाला भिंगरी बांधून जिल्हाच नव्हे तर राज्यातील विविध दुष्काळी भागांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करत आहेत. मलकापूरपासून सुरू झालेल्या यात्रेला विविध तालुक्यांतून मिळणारा प्रतिसाद हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि विश्वासाचा पुरावा आहे. चिखली तालुक्यातील गावागावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद घेत यात्रा आता मेहकर तालुक्यात दाखल झाली आहे.

४ डिसेंबरला बुलढाणा येथे होणाऱ्या शेतकरी एल्गार महामोर्चात पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शेतकरी आणि शेतमजुरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष करूया आणि सरकारला शेतकऱ्यांच्या ताकदीची जाणीव करून देऊया, असे आवाहन विनायक सरनाईक यांनी केले.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.