दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाहेरील जनावरांना जिल्ह्यात ‘नो एन्ट्री’; अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा आदेश, तर तेल्हारा तहसीलदार महेश रामगुंडे यांचे विशेष आवाहन.

विजय घोडे आवाज न्यायाचा
तेल्हारा /अकोला (प्रतिनिधी) दि. २२ नोव्हें.२६:
अकोला जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे स्थानिक पशुधनासाठी चारा आणि पशुखाद्याची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशानुसार, परजिल्ह्यातील तसेच परराज्यातील जनावरांना चाऱ्यासाठी अकोला जिल्ह्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे विशेष आवाहन तेल्हारा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी महेश रामगुंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यातील उपलब्ध चारा हा केवळ स्थानिक जनावरांसाठीच राखीव राहावा आणि त्याचे योग्य नियोजन व संवर्धन व्हावे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे कोणत्याही पशुपालकाने, शेतकऱ्याने किंवा वाहतूकदाराने बाहेरील जिल्ह्यातील अथवा राज्यातील जनावरे चाऱ्यासाठी जिल्ह्यात आणू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई
प्रशासनाने जारी केलेल्या या प्रतिबंधात्मक आदेशाचे कोणीही उल्लंघन केल्यास कठोर भूमिका घेतली जाणार आहे. बाहेरील जनावरे जिल्ह्यात आणल्याचे निदर्शनास आल्यास केवळ जनावरांचे मालक आणि वाहतूकदारच नव्हे, तर अशा जनावरांना चारा उपलब्ध करून देणारे किंवा त्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी मदत करणारे स्थानिक शेतकरी व नागरिक यांच्याविरुद्धही प्रचलित कायद्यानुसार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदार महेश रामगुंडे यांनी दिला आहे.
संकटाच्या या काळात स्थानिक पशुधन वाचवण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांनी जबाबदारीने वागावे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Related
खानदेशमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्र...
खानदेशमयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या म...
बुलढाणासावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह...
खानदेश

