Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
आंतरराष्ट्रीय

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १५ अनारक्षित विशेष गाड्या; मलकापूरसह प्रमुख स्थानकांवर थांबे!

Administrator • 23 Nov 2026, 03:30 PM

कार्यकारी संपादक करण झनके

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. ४ ते ८ डिसेंबर २०२६ या कालावधीत १५ अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांतून मुंबईत येणाऱ्या अनुयायांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नागपूर–मुंबई मार्गावर विशेष रेल्वे सेवा

नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या 01260, 01262, 01264 आणि 01266 या चार विशेष रेल्वे गाड्या ४ व ५ डिसेंबर रोजी धावणार आहेत. तर मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या 01249, 01253, 01251, 01255 आणि 01257 या पाच विशेष गाड्या ६ ते ८ डिसेंबरदरम्यान प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध असतील.

अमरावती आणि कोल्हापूर मार्गावरही विशेष गाड्या

अमरावती–मुंबई मार्गावर 01218 ही विशेष रेल्वे ५ डिसेंबर रोजी धावणार असून, मुंबई–अमरावती 01217 ही विशेष रेल्वे ७ डिसेंबर रोजी धावेल. याशिवाय कोल्हापूर आणि मुंबईदरम्यान 01402 आणि 01401 या विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मलकापूर रेल्वे स्थानकावरही थांबा

या विशेष रेल्वे गाड्यांना भुसावळ, जळगाव, मलकापूर, अकोला, बडनेरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण आणि दादर यांसह प्रमुख रेल्वे स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे मलकापूर व परिसरातील अनुयायांनाही मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.

गाड्यांच्या संरचनेनुसार १८ किंवा २४ डबे असणार असून, सर्व विशेष गाड्या अनारक्षित स्वरूपात धावणार आहेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी जाणाऱ्या लाखो अनुयायांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी मध्य रेल्वेचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

प्रवाशांसाठी सूचना : विशेष रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि इतर माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲपचा वापर करावा.

संदर्भ व माहिती : Adv. महेंद्र कुमार बुरड, माजी सदस्य – ZRUCC, मध्य रेल्वे; अध्यक्ष – जिल्हा प्रवासी सेवा संघ, मलकापूर; सह-संयोजक – भाजपा रेल्वे प्रकोष्ठ, महाराष्ट्र.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.