Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
खानदेश

चिखली बाजार समितीच्या २५ वर्षांच्या कारभाराची ‘श्वेतपत्रिका’ काढा!

Administrator • 24 Nov 2026, 02:50 AM

आवाज न्यायाचा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली. तालुका. प्रतिनिधी

थकीत वेतन, पीएफ आणि विम्याच्या कपातीवरून संचालक नीरज चौधरी यांचा सभापतींवर पलटवार व जिल्हा उपनिबंधकांकडे सखोल चौकशीची मागणी….

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि विम्याच्या रकमेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे विद्यमान संचालक नीरज चौधरी यांनी सभापतींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मागील २५ वर्षांच्या आर्थिक आणि प्रशासकीय कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. बाजार समितीच्या संपूर्ण कारभाराची पारदर्शक माहिती जनतेसमोर आणण्यासाठी २५ वर्षांची ‘श्वेतपत्रिका’ प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी बुलढाणा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचे वेतन सुरळीत सुरू असल्याचा दावा करत नऊ महिन्यांचे वेतन थकण्याची जबाबदारी तत्कालीन भाजप प्रशासक मंडळावर टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना नीरज चौधरी यांनी बाजार समितीच्या २५ वर्षांच्या इतिहासात भाजपचे प्रशासक मंडळ कधीही आले नसल्याचे म्हटले आहे. मग मागील पंचवीस वर्षांपासून बाजार समितीचा कारभार नेमका कोणाच्या ताब्यात होता, असा सवाल उपस्थित करत वेतन थकण्याच्या कारणांची वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मागील पाच वर्षांपासून कपात करण्यात आलेली भविष्य निर्वाह निधीची (PF) रक्कम, पीएफ कर्ज तसेच इतर कपातींचा भरणा अद्याप प्रलंबित का आहे, असा गंभीर प्रश्न चौधरी यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे वेतनातून विम्याची रक्कम कपात करूनही ती वेळेवर जमा न केल्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या विमा पॉलिसी बंद पडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशांबाबत झालेल्या या प्रकाराची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बाजार समितीच्या मागील २५ वर्षांतील उत्पन्न, खर्च, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय निर्णयांची कागदपत्रांच्या आधारे सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे नऊ महिन्यांचे वेतन नेमके कोणत्या कारणामुळे थकले आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे, याची निश्चिती करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

बाजार समितीने आजवर किती कर्ज घेतले, कोणत्या कारणासाठी घेतले, कर्जाची रक्कम कुठे खर्च झाली आणि सध्या किती कर्ज थकीत आहे, याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, असेही चौधरी यांनी म्हटले आहे. बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न, प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि कर्जावरील व्याज यांचा सविस्तर ताळेबंद जनतेसमोर मांडण्यात यावा. मागील २५ वर्षांतील सत्ताधारी संचालक मंडळे, प्रशासकांचा कार्यकाळ, आर्थिक व्यवहार, कर्जे आणि थकीत देणी यांचा समावेश असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी त्यांची मागणी आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

बाजार समितीच्या आर्थिक व्यवहारांत अनियमितता किंवा प्रशासकीय हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका चौधरी यांनी मांडली आहे. बाजार समितीच्या कारभाराबाबत जिल्हा उपनिबंधकांनी खुलासा मागविल्याची बाबही त्यांनी निवेदनात नमूद केली आहे. समितीकडून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतुदींनुसार दोषींवर वैधानिक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती चिखलीचे सहाय्यक निबंधक आणि बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत. आता जिल्हा उपनिबंधक या मागणीवर काय भूमिका घेतात आणि बाजार समितीच्या २५ वर्षांच्या आर्थिक कारभाराची चौकशी होते का, याकडे चिखलीकरांचे लक्ष लागले आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.