खामगाव बसस्थानकावर गांजाची तस्करी उघड; दोघे ताब्यात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
खामगाव : बसस्थानक परिसरात विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या दोन जणांना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. २३ नोव्हेंबर रोजी केलेल्या या कारवाईत ५ किलो ९४७ ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा एकूण ३ लाख १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सचिन प्रभाकर थिगळे आणि शेख सलीम शेख रजाक (दोघे रा. चिखली) अशी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे आहेत. त्यांच्याकडून २ लाख ९७ हजार ३५० रुपये किमतीचा ५ किलो ९४७ ग्रॅम गांजा तसेच २० हजार रुपये किमतीचे इतर साहित्य जप्त करण्यात आले.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि खामगावचे अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), २०(ब) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी खामगाव शहर पोलीस ठाण्यात अहवालासह जमा करण्यात आला आहे.
या कारवाईत एपीआय सुनील इंगळे, हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, राजू टेकाळे, अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश सनगळे, सतीश नाटेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल आशा मोरे, चालक हेड कॉन्स्टेबल समाधान टेकाळे, पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती पुंड तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि टीएडब्ल्यू बुलढाणा येथील पोलीस कॉन्स्टेबल कैलास ठोंबरे यांनी सहभाग घेतला.
Related
खानदेशमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्र...
खानदेशमयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या म...
बुलढाणासावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह...
खानदेश

