Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
शेती

सोयाबीनची झालेली नुकसान भरपाई तत्काळ द्या; रविकांत तुपकर यांची कृषिमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी;

Admin • 08 Oct 2023, 04:32 AM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

जिल्ह्यातील सोयाबीनवर’ येलो मोझॅको, या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले असून उत्पादनात घट येणार असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.’येलो मोझॅक’मुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील व बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद आहे की, बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा आहे. आधीच जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा राहिली आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. त्यात ‘येलो मोझॅक’रोगाने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढविली आहे. प्रचंड उत्पादन खर्च लावून मोठ्या मेहनतीने उगवलेले सोयाबीन डोळ्यासमोर जातांना पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पिकावर ‘येलो मोझॅक’नावाचा रोग पडल्याने सोयाबीनची पाणी पिवळी पडून सोयाबीनचे पीक नेस्तनाभूत होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. गेल्या वर्षी सोयाबीन कापसाला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाला होता, त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. परंतु आस्मानी व सुलतानी संकटाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. राज्य सरकारने ‘ येलो मोझॅक’ ने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुस्कान असूनही पंचनामापासून बुलढाणा जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. जिल्ह्यातील सोयाबीनची परिस्थिती पाहता तातडीने बुलढाणा जिल्ह्यात ‘येलो मोझॅक’ ने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून १००% नुस्कान भरपाई देण्यात यावी, सोयाबीन सोनीचे दिवस सध्या सुरू होत आहे. त्यामुळे सोयाबीन सोगंणी पूर्वी पंचनामे करावी अशी मागणी, रविकांत तुपकर यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील व बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.