Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
खानदेश

कॉलेज ते गुन्हेगारी! तरुणाईला योग्य दिशा देणारी मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Administrator • 23 Nov 2026, 02:28 PM

भाईगिरी, चुकीची संगत आणि गुन्हेगारीच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईला वास्तवाचा आरसा; शिक्षणाचे महत्त्व आणि आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव करून देणारा सामाजिक संदेश!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस | जळगाव जिल्हा प्रतिनिधी : विनोद तायडे

रावेर : आजच्या तरुणाईमध्ये वाढत चाललेली भाईगिरी, चुकीची संगत आणि गुन्हेगारीकडे वळणारी पावले यावर प्रभावी भाष्य करणारी ‘कॉलेज ते गुन्हेगारी’ ही मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केवळ मनोरंजन हा उद्देश न ठेवता तरुण पिढीला योग्य दिशा देणे, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि समाजात जनजागृती निर्माण करणे हा या मालिकेचा मुख्य हेतू आहे.

आजच्या काळात अनेक तरुण चुकीच्या मित्रांच्या संगतीमुळे शिक्षणापासून दूर जात आहेत. भाईगिरीचे आकर्षण, दिखाऊ प्रतिष्ठा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रभावाखाली येऊन काही तरुण स्वतःचे उज्ज्वल भविष्य धोक्यात घालत आहेत. मैत्री करताना योग्य मित्रांची निवड किती महत्त्वाची असते आणि चुकीच्या संगतीचे परिणाम संपूर्ण आयुष्यावर कसे होतात, याचे वास्तववादी चित्रण या मालिकेतून करण्यात आले आहे.

भाईगिरी काही काळाची; मात्र गुन्हेगारीचे परिणाम आयुष्यभराचे!

भाईगिरीच्या नावाखाली मिळणारी तात्पुरती प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा ही क्षणिक असते. मात्र गुन्हेगारीच्या मार्गावर गेलेल्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याबरोबरच त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही मानसिक, सामाजिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई-वडील आयुष्यभर कष्ट करतात, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणासाठी धडपडतात. मात्र मुलांनी चुकीचा मार्ग स्वीकारल्यास त्याच आई-वडिलांच्या डोळ्यांत अश्रू येतात, ही समाजातील अत्यंत वेदनादायक वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे तरुणांनी आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवावी, शिक्षणाला प्राधान्य द्यावे, चांगली संगत निवडावी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर आपले भविष्य घडवावे, असा मोलाचा संदेश या मालिकेतून देण्यात येणार आहे.

पत्रकारिता, लेखन, दिग्दर्शन आणि स्थानिक कलाकारांचा अनोखा संगम!

या मालिकेचे मुख्य मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार दीपक नगरे असून, कथा लेखन ऋषी कोळी यांनी केले आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी भूषण पाटील यांनी सांभाळली आहे. शूटिंग व एडिटिंग छत्रपती सिनेमॅटिक यांनी केले असून, ड्रोन शूटिंग राहुल कोळी यांनी केले आहे.

मालिकेत आई-वडिलांची भूमिका तांदलवाडी येथील सिद्धार्थ किसन तायडे सर आणि सुरेखा सिद्धार्थ तायडे यांनी साकारली आहे. तर पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत नितीन भवर, अतिश कोळी आणि योगेश पाटील यांनी अभिनय केला आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य, उत्तर महाराष्ट्र संघटक तथा दैनिक लोकशाहीचे प्रतिनिधी मा. श्री. विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई G) यांचे लहान बंधू, श्रद्धा सबुरी बूट हाऊसचे संचालक आणि खानदेशी ब्लॉगर चि. तुषार रामचंद्र कोळी यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून या सामाजिक आशयाच्या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.

स्थानिक कलाकारांना मिळाली अभिनयाची संधी!

या मालिकेत धनराज कोळी, राहुल कोळी, लिलाधर कोळी, कौशल पाटील, कल्पेश चौधरी, गौरव चौधरी, मनीष बावस्कर, रोहन पाटील, मिलिंद लहासे, लखन मोरे, करण मोरे, किरण कोळी, कान्हा कोळी, स्वप्नील ठाकरे, देवानंद कोळी, रोहित कोळी, यश नव्ही, सतीश नव्ही, शिवा एस.पी., भैय्या पाटील, अविनाश चौधरी, खुशी वाघोळदे, अतुल पाटील, दिव्या चौधरी, धनश्री, राणी टायडे आणि नितीन कोळी (डान्सर) यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.

स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत सामाजिक विषयावर आधारित ही मालिका साकारण्यासाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली आहे. या निर्मितीसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे टीमच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

लवकरच अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर प्रदर्शन!

तरुणाईला विचार करायला भाग पाडणारी आणि पालकांनाही आपल्या मुलांच्या संगतीकडे व वर्तनाकडे लक्ष देण्याचा संदेश देणारी ‘कॉलेज ते गुन्हेगारी’ ही मराठी मालिका चि. तुषार रामचंद्र कोळी यांच्या अधिकृत Instagram अकाउंट @rishi__1408 वर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

“भाईगिरीत आयुष्य घालवण्यापेक्षा शिक्षणातून भविष्य घडवा आणि आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हास्य फुलवा!” हा प्रेरणादायी संदेश देणारी ही मालिका तरुणाईसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.