Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे आणि समतेचा विचार समाजात रुजवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना एकलारा बानोदा येथे अभिवादन! पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांची उपस्थिती; महात्मा फुलेंच्या विचारांना उजाळा….!देऊळगाव राजा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण!नांदुऱ्याची लेक बनली ‘मिसेस मध्यप्रदेश,कर्तृत्व : अंकिता घोंगडे-धोरण यांना मध्य प्रदेशातील सौंदर्य स्पर्धेत ‘रनर-अप’चा किताब,महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नगरसेविका दिशाताई खांडेभराड यांच्यातर्फे विनम्र अभिवादन; विचार आत्मसात करण्याचे आवाहनसेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरीसहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षसमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोबा डोके यांचे कार्य आजही प्रेरणादायी!पशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल – दुग्धव्यवसाय परवडेल तरी कसा?अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; दोन वाहने पकडली!स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे आणि समतेचा विचार समाजात रुजवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना एकलारा बानोदा येथे अभिवादन! पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांची उपस्थिती; महात्मा फुलेंच्या विचारांना उजाळा….!देऊळगाव राजा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण!नांदुऱ्याची लेक बनली ‘मिसेस मध्यप्रदेश,कर्तृत्व : अंकिता घोंगडे-धोरण यांना मध्य प्रदेशातील सौंदर्य स्पर्धेत ‘रनर-अप’चा किताब,महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नगरसेविका दिशाताई खांडेभराड यांच्यातर्फे विनम्र अभिवादन; विचार आत्मसात करण्याचे आवाहनसेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरीसहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षसमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोबा डोके यांचे कार्य आजही प्रेरणादायी!पशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल – दुग्धव्यवसाय परवडेल तरी कसा?अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; दोन वाहने पकडली!
खानदेश

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच 12 वर्षे सक्षम गव्हांदेंचा मृत्यू…. न्यायासाठी गव्हांदे कुटुंबाचे धरणे. …

Administrator • 27 Nov 2026, 04:12 PM

खामगाव प्रतिनिधी
जी डी रोकडे खामगाव तालुका

. जनुना तालुका खामगाव येथे कुत्र्याने चावा घेतल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात बारा वर्षीय सक्षम सुमेश गव्हांदे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने खामगाव खामगाव संताप व्यक्त होत आहे या प्रकरणात सरकारी डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे सक्षम चा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी 26 नोव्हेंबर पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सक्षम चे कुटुंबांनी दिलेल्या निवेदनुसार सक्षम हा रेबीज चा रुग्ण असल्याची माहिती असतानाही सामान्य रुग्णालय खामगाव येथील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी सेवेत निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सामान्य रुग्णाचे वैद्यकीय अधीक्षक टापरे यांच्या अधिनस्त असलेल्या संबंधित वैद्यकीय अधिकारी व नर्स यांच्यावर फौजरी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सिल्वर सिटी हॉस्पिटल खामगाव येथील डॉक्टर गौरव लड्डा यांनी सक्षम हा रेबीज चा रुग्ण असल्याची माहिती असतानाही त्याला रुग्णालयात दाखल करून घेतले व उपचाराच्या नावाखाली 9000 रुपये घेतल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टर वर ही गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. ५ नोव्हेंबर रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने तातडीने कारवाई करून संबंधितवार फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे भविष्यात अशा घटना घडवून नयेत यासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे रेबीज वरील अत्याधुनिक औषधी व आवश्यक उपचार सुविधा करून द्याव्यात अशी ही मागणी करण्यात आली आहे…….

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.