Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
सहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षसमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोबा डोके यांचे कार्य आजही प्रेरणादायी!पशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल – दुग्धव्यवसाय परवडेल तरी कसा?अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; दोन वाहने पकडली!दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या महिलांच्या घरावर फायनान्स कंपन्यांचे धाडसत्र; सक्तीची वसुली तात्काळ थांबवा, तालुका काँग्रेस व महिला बचत गटांची मागणी ,बोडखा गावात सविधान दिन उत्साहात साजरा:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन;संविधानाच्या प्रतिचे सामूहिक वाचन.चिखलीतील अवैध धंद्यांविरोधात शिवसेना आक्रमक!वरली मटका, जुगार आणि सट्टा अड्डे तात्काळ बंद करा; शिवसेनेचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना इशारा,शेतकऱ्यांचा एल्गार! आजपासून रास्ता रोको आंदोलनासह आमरण उपोषण सुरूप्रेस क्लबच्या अध्यक्षपदी किरण सेदानी तर कार्याध्यक्ष व सचिव पदी मनिष भुडके व बाळासाहेब नेरकर यांची निवडडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच 12 वर्षे सक्षम गव्हांदेंचा मृत्यू…. न्यायासाठी गव्हांदे कुटुंबाचे धरणे. …सहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षसमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोबा डोके यांचे कार्य आजही प्रेरणादायी!पशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल – दुग्धव्यवसाय परवडेल तरी कसा?अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; दोन वाहने पकडली!दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या महिलांच्या घरावर फायनान्स कंपन्यांचे धाडसत्र; सक्तीची वसुली तात्काळ थांबवा, तालुका काँग्रेस व महिला बचत गटांची मागणी ,बोडखा गावात सविधान दिन उत्साहात साजरा:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन;संविधानाच्या प्रतिचे सामूहिक वाचन.चिखलीतील अवैध धंद्यांविरोधात शिवसेना आक्रमक!वरली मटका, जुगार आणि सट्टा अड्डे तात्काळ बंद करा; शिवसेनेचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना इशारा,शेतकऱ्यांचा एल्गार! आजपासून रास्ता रोको आंदोलनासह आमरण उपोषण सुरूप्रेस क्लबच्या अध्यक्षपदी किरण सेदानी तर कार्याध्यक्ष व सचिव पदी मनिष भुडके व बाळासाहेब नेरकर यांची निवडडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच 12 वर्षे सक्षम गव्हांदेंचा मृत्यू…. न्यायासाठी गव्हांदे कुटुंबाचे धरणे. …
बुलढाणा

पशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल – दुग्धव्यवसाय परवडेल तरी कसा?

Administrator • 27 Nov 2026, 04:39 PM

स्टार भारत लाईव एक्सप्रेस

प्रतिनिधी:गजानन तांगडे, खामगांव

आज राष्ट्रीय दूध दिन
खामगाव : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता खर्चाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दुधाला मिळणाऱ्या दरात काही प्रमाणात वाढ होत असली, तरी दुसरीकडे पशुखाद्य, सरकी पेंड, गोळी पेंड आणि चाऱ्याचे दरही वाढत आहेत. परिणामी, दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न पशुधनाच्या संगोपनावरच खर्च होत असल्याने दुग्धव्यवसायातील नफ्याचे गणित बिघडले आहे.
नोव्हेंबर महिन्यात पशुखाद्याच्या पोत्यामागे सुमारे ४०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याची नोंद आहे.
कच्च्या मालाचे दरही वाढले
दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर जनावरे सांभाळायची कशी असा प्रश्न आहे.पशुखाद्य निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली आहे. ४० किलो सरकी पेंडीचा दर १,७०० ते १,८०० रुपये, ५० किलो गोळी पेंडीचा दर १,८०० ते २,१०० रुपये, तर ५० किलो मका भरड्याचा दर सुमारे १,७५० रुपये नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे पशुखाद्य तयार करण्यापासून ते जनावरांना चारा देण्यापर्यंतचा खर्च वाढत आहे.
पशुखाद्याच्या दरात सातत्याने वाढ
दूध उत्पादक शेतकऱ्यांना पशुखाद्याच्या वाढत्या किमतीचा फटका बसत आहे. पशुखाद्याच्या दरात जानेवारीपासून आतापर्यंत पोत्यामागे सुमारे ४०० रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांतच पोत्यामागे सुमारे २८० रुपयांची वाढ झाली. दर १५ ते २० दिवसांनी ८० ते १२० रुपयांची दरवाढ होत असल्याचेही दूध उत्पादकांनी निदर्शनास आणून दिले आहे. सोयाबीन आणि मक्याच्या वाढलेल्या किमतींमुळे पशुखाद्य निर्मितीचा खर्च वाढल्याचे यामागील कारण सांगितले जात आहे.आहाराचे गणितही महत्त्वाचे
राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एका सामान्य प्रौढ जनावराला दररोज साधारण सहा किलो सुका चारा आणि १५ ते २० किलो हिरवा चारा देण्याची शिफारस आहे. याशिवाय दूध उत्पादन, जनावराचे वजन आणि शारीरिक गरजेनुसार संतुलित पशुखाद्य देणे आवश्यक आहे. म्हणजेच, दूध देणाऱ्या जनावरांच्या आहारासाठी दररोज मोठ्या प्रमाणात चारा आणि पूरक खाद्याची गरज असते. हिरवा चारा स्वतःच्या शेतात उपलब्ध नसल्यास तो विकत घ्यावा लागतो. यंदाच्या कमी पावसाच्या परिस्थितीत चाऱ्याची उपलब्धता आणि त्याचा खर्च हा पशुपालकांसाठी आणखी एक चिंतेचा विषय ठरत आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.