बोडखा गावात सविधान दिन उत्साहात साजरा:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन;संविधानाच्या प्रतिचे सामूहिक वाचन.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.२७/११/२०२६.
संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आणि महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रज्वलन करण्यात आले. सामूहिकरीत्या त्रिशरण, पंचशील, घेऊन बुद्ध वंदना. धम्म वंदना. आणि संघ वंदना घेण्यात आली.
कार्यक्रम दरम्यान भारतीय संविधानाच्या प्रतीचे वाचन करून उपस्थितांना संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी, नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्य तसेच लोकशाही मूल्याची माहिती देण्यात आली. संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला समतेचा, स्वातंत्र्याचा, न्यायचा आणि बंधुतेचा संदेश दिला आहे. या मूल्याचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून देशाला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला मार्गदर्शन करणारे संविधान दिले, त्यामुळे संविधान दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रमात नसून संविधानातील विचार आणि मूल्ये आपले जीवनात आचरणात आणण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पंचशील मंडळ तसेच भिम युवा क्रांती मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नामुळे संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.
बोडखा गावातील नागरिकांनी संविधान दिनानिमित्त एकत्र येत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन केले. संविधानाचे महत्त्व नव्या पिढी पर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा देश असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.
संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान आणि समतेचा विचार नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या संविधान दिनाच्या कार्यक्रमातून देण्यात आला.
Related
खानदेशसहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या ...
बुलढाणासमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोब...
बुलढाणापशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल...
बुलढाणा

