देऊळगाव राजा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण!

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचा समतेचा विचार समाजात रुजवणे हीच खरी आदरांजली: आमदार मनोज कांयदे.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देऊळगाव राजा येथे आमदार मनोज कायंदे यांनी महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी दोन्ही महामानवांच्या महान कार्याचे स्मरण करत कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना आमदार मनोज कायंदे म्हणाले की, “शिक्षण, समता, स्त्री-सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजात रुजविणारे महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान भारतीय समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील.”
समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाची संधी, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि प्रगतीची समान संधी मिळवून देणे, हीच या महान समाजसुधारकांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला स्थानिक ,
संतोष खांडेभराड,धनशिराम शिपने,प्रदीप वाघ, झोटे सर, सदाशिव मुंडे, सुनील शेजुळकर, विकास कासारे, गौरव गीते, निशिकांत भावसार, प्रवीण धन्नावत, विष्णू झोरे, राजू खांडेभराड, अजगर शहा, व्यंकटेश आढाव, कुणाल माळोदे,पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related
बुलढाणास्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे आणि समतेचा विचार समाजात रुजवणारे महात्मा ज्य...
बुलढाणाक्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना एकलारा बानोदा येथे अभिवादन! पुण...
बुलढाणानांदुऱ्याची लेक बनली ‘मिसेस मध्यप्रदेश,कर्तृत्व : अंकिता घोंगडे-धोरण यां...
खानदेश

